मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील घरावर ईडीने छापा टाकल्याने राज्यकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? असा उपरोधात्मक प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी पहिल्यांदाच आघाडीतील मतभेदावर भाष्य केले आहे.
भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.
भाजपामध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपामध्ये नाहीये का?
- भाजपा नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का?
- कुणी चणे विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?
- तुमच्याकडे काय आहे. तुम्ही जे शकडो हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो.
- तुमचे इमले, बंगले कसे उभे राहिले.
- आम्ही दिलेले कागदपत्रे पुरावे ठरत नाहीत, पण तुमचे चिटोरे पुरावे ठरतात.
- हा न्याय नाही.
- परत परत सांगतो, घाई नाही.
- पण सर्व समोर येईल.
- मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे.
- पण हे काही काळच राहणार.
हीच मोहीम उद्या भाजपावर उलटल्या शिवाय राहणार नाही!
- आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत.
- पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे.
- मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही.
- केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे.
- काल पाटणकरांवर कारवाई केली.
- त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं.
- हे नीट समजून घ्या.
- चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत.
- हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील.
- ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे.
- हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही.
- मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे.
भाजपाच्या घोटाळ्यांवर सोमय्या बोलले का?
- सोमय्यांना काहीही बोलू देत.
- त्यांच्या बोलण्याला कोण विचारतं.
- ते काहीही बोलतात.
- हवाला किंगशी भाजपाचे काय संबंध आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिलेत ना.
- त्यापुराव्याबाबत मला पोचपावती आले आहे.
- त्यावर करतंय का ईडी कारवाया?
- भाजपच्या घोटाळ्यावर सोमय्या बोलले का? सोमय्यांनी ज्या नेत्यांविरोधात ईडीकडे कारवाईची मागणी केली, ज्या नेत्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली, ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर सोमय्यांची वाचा गेली.
- अशा माणसावर काय विश्वास ठेवायचा?
ही हुकूमशाहीची नांदी
- पाटणकर प्रकरणात मालमत्ता जप्त करण्यापूर्वी चौकशी करायला हवी होती.
- पण त्यांनी कारवाई केली.
- ही हुकूमशाहीची नांदी आहे.
- कुणी कुणाला घाबरलेलं नाही. का घाबरायचं? सर्वांनी एकजुटीने लढावं ही महाविकास आघाडीची भूमिका आहे.
असं कधी सरकार अस्थिर होतं का?
- ईडीच्या कारवायांनी सरकार अस्थिर होईल असं काही नाही. असं कधी सरकार अस्थिर होतं का?
- उलट सरकार अधिक मजबूत झालं.
- आमच्यात ज्या काही फटी पडल्याचं वाटत होतं, त्या फटी बुजल्या आहेत.
- आमच्यात मतभेद असल्याच्या काही ठिकाणी संशयाला जागा होत्या, त्या बुजल्या आहेत.
- या निमित्ताने आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रं आले आहेत.
या अभियानाला सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया
- जितेंद्र नवलानी प्रकरणी कारवाई सुरू आहे.
- एक सूत्रं लक्षात घ्या. कालपासून विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू झालं.
- हे अभियान सुरू झाल्यानंतर त्याचा वेग पकडू लागला.
- या अभियानाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
- या अभियानाला प्रसिद्धीही मिळत आहे.
- या अभियानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या.
- काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे.
- या अभियानावरून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे