मुक्तपीठ टीम
अनेक वर्ष लॅपटॉप मार्केटमध्ये सॅमसंगने नवं काही केलं नव्हतं. ती सक्रिय नव्हती असं म्हटलं तरी चालेल. आता मात्र सॅमसंग कंपनीने एकत्र सहा लॅपटॉप लॉंच केले आहेत. यात गॅलेक्सी २ ३६०, गॅलेक्सी बुक २ प्रो ३६०, गॅलेक्सी बुक २ बिजनेस आणि गॅलेक्सी बुक गो यांचा समावेश आहे. या लॅपटॉपमध्ये सर्वात स्वस्त गॅलेक्सी बुक गो हा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल नाही तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७सी जेन २ चिपसेट दिलेले आहेत. क्वॉलकॉम हे प्रामुख्याने मोबाइल प्रोसेसर बनवतात. सॅमसंगच्या या लॅपटॉप्सचं खास वैशिष्ट्य असं की, स्मार्टफोनचे काही फिचर्स या लॅपटॉपमध्ये उपलब्ध असतील.
लॅपटॉपची किंमत
- या लॅपटॉपची सुरवात ३८,९९० रूपयांपासून सुरू होते.
- कंपनीने ग्राहकांना कॅशबॅक ऑफरची सुविधा दिलेली आहे.
- ३,००० रूपये पर्यंतचा इस्टॅंट कॅशबॅक ग्राहक मिळवू शकतील.
- गॅलेक्सी बुक२ ची किंमत ६५,९९० रूपये आहे.
- तसेच गॅलेक्सी बुक २ ३६० ची किंमत ९९,९९० रूपयांपासून सुरू होते.
- गॅलेक्सी बुक २ प्रोची किंमत १०६,९९० रूपयांपासून सुरू होते.
- गॅलेक्सी बुक २ बिजनेसची किंमत १०४,९९० रूपयांपासून सुरू होते.
लॅपटॉपमध्ये फोनमधील फिचर!
- या हाय एंड लॅपटॉपमध्ये इंटेलच्या १२व्या जनरेशनचे चिपसेट दिलेले आहेत.
- जे १० एनएम फॅब्रिकेशन प्रोसेसवर तयार करण्यात आले आहे.
- हे इंटेल ७ म्हणून ओळखले जाते.
- सॅमसंगने आपल्या सर्व लॅपटॉपमध्ये गॅलेक्सीचे अनेक अॅप्स आणि फिचर दिलेले आहेत.
- यात बिक्सी बाय, लिंक शेयरिंग, क्विक शेयर, सॅमसंग गॅलरी, सॅमसंग नोट्स आणि सेकंड स्क्रिन सारख्या फिचरचा समावेश आहे.
- अनेक वर्षानंतर सॅमसंग लॅपटॉप मार्केटमध्ये एंट्री करत आहे.
- रिस्पॉन्स किती मिळेल हे सुद्धा पहावे लागेल.
- सध्या मार्केटमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे.