Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमआयएमची ऑफर: भाजपा नेते शिवसेनेविरोधात बोलले, शिवसेना-काँग्रेसने दणकावले!

March 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Atul Londhe Chandrakant Khaire Nitesh rane

मुक्तपीठ टीम

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीकेचा मारा केला आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका केली आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एमआयएमवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमची ऑफर ही प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यातील कल्पना असल्याचं म्हटलं आहे.

 

अतुल लोंढे कडाडले, एमआयएम धर्मनिरपेक्ष कुठे?

  • एमआयएम हा धर्मनिरपेक्ष नाही.
  • त्यांच्याबरोबर गेलं तरच मुस्लीम मते मिळतील हा त्यांचा दावा चुकीचा.
  • मुस्लीम मते ही एमआयएमची ठेकेदारी नाही.
  • जे धर्मनिरपेक्ष भूमिकेत त्यांना ती मते मिळतील.
  • एमआयएम ही भाजपाची बी टीम म्हणूनच काम करते.
  • बिहार, यूपी निवडणुकीतून ते दिसून आले.
  • त्यांचा डाव महाराष्ट्रात यशस्वी होवू देणार नाही.

 

नितेश राणेंची शिवसेनेवर मुस्लीम अनुनयाचा आरोप

  • नितेश राणे म्हणाले की, एमआयएम हा कट्टरतावादी पक्ष आहे.
  • टोकाची भूमिका घेतो.
  • ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते.
  • टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते.
  • एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे.
  • सध्या एका एमआयएम या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही आयसीसला ही आवडणार.
  • आता आयसीसबरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे.
  • उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही आयसीसबरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय.
  • एवढेच राहिलेले आहे. करून दाखवलं, याचा खरा अर्थ आज शिवसेनेने महाराष्ट्रासमोर करून दाखवला.

 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी फटकारले

  • एमआयएम आम्हालाऑफर देऊच शकत नाहीत.
  • शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत.
  • संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत.
  • ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं.
  • आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे.
  • आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे.
  • एमआयएमशी त्यांचं आतून टायअप झालं असेल. अशा वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक होईल आणि आघाडी तुटेल, असा डावपेच आखला आहे.
  • देवेंद्र फडणवीसजी खूप बुद्धीवादी आहेत.
  • त्यांच्याच डोक्यातील ही कल्पना आहे.
  • त्यांचा हा बी प्लॅन आहे.

Tags: AIMIMAtul LondheChandrakant Khairedevendra fadnavisMIM imtiaz jaleelnitesh ranesanjay rautअतुल लोंढेइम्तियाज जलीलचंद्रकांत खैरेंदेवेंद्र फडणवीसनितेश राणेशिवसेनासंजय राऊत
Previous Post

भारतातील सोन्याच्या खाणीतून दीड टन उत्पादन! वर्षाला २० टन उत्पादनासाठी वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलचा सल्ला…

Next Post

राज्यात ९७ नवे रुग्ण, २५१ रुग्ण बरे! विदर्भात एकही नवा रुग्ण नाही!

Next Post
Corona

राज्यात ९७ नवे रुग्ण, २५१ रुग्ण बरे! विदर्भात एकही नवा रुग्ण नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!