मुक्तपीठ टीम
देशातील ८६%पेक्षा जास्त शेतकरी लहान आणि अल्पभूधारक आहेत. आपल्या शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, कर्ज, चांगली माहिती आणि अधिक चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जास्त बाजारपेठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने “१०,००० कृषी उत्पादक संघटना(एफपीओ) ची स्थापना आणि प्रोत्साहन” ही केंद्रीय योजना सुरू केली आहे.
देशभरात १०,००० नव्या एफपीओजची स्थापना आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्पष्ट धोरण आणि संसाधनांची हमी देण्याचा या योजनेचा उद्देश आहे आणि त्यासाठी ६८८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. एफपीओची स्थापना आणि प्रोत्साहन हे कृषीचे रुपांतर आत्मनिर्भर कृषीमध्ये करण्याचे पहिले पाऊल आहे. यामुळे किफायतशीर उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये आणि या एफपीओच्या सदस्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल आणि ग्रामीण भागातच युवकांना रोजगार उपलब्ध होतील.
पाहा व्हिडीओ: