मुक्तपीठ टीम
मध्यप्रदेशातील भीमबेटका येथे जगातील सर्वात जुन्या जीवाश्मांपैकी एक जीवाश्म सापडला आहे. भीमबेटका येथील ऑडिटोरियम गुहेत ५७० दशलक्ष वर्षापूर्वीचा डिकिंन्सोनिया हा जगातील सर्वात जुना जीवाश्म असावा, असा संशोधकांचा विश्वास आहे.
गोंडवाना रिसर्च या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या फेब्रुवारीच्या आवृत्तीत हा शोध प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी दर्शवलेल्या आवृत्तीत डिकिंसोनिया जीवाश्मांची लांबी चार फूटपेक्षा जास्त आहे. परंतु भीमबेटकामध्ये सापडलेला हो जीवाश्म १७ इंच लांब आहे.
संशोधकांनी पाहिले तेव्हा तो जीवाश्म ओळखताच आला नाही. तो जमिनीच्या अकरा फूटांवर पृष्ठभागात मिसळून गेलेला. जसा काही एखादे पाषाण शिल्पच वाटत होता. पण संशोधकांनी जिद्दीनं शोध घेतला, अभ्यास केला तेव्हा लक्षात आले ते तर ५४१ दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहे.
हे जीवाश्म भोपाळजवळील भीमबेटका रॉक शेल्टर्स येथे ऑडिटोरियम लेणीच्या छतावर सापडले. ते दक्षिण ऑस्ट्रेलियामधील रॉन्सले क्वार्टझिटच्या एडिआकारा मेम्बर डिकिन्सोनिया टेन्यूइससारखेच आहे.
इतक्या वर्षांत ते कसे सापडले? भीमबेटका रॉक आश्रयस्थान ६४ वर्षांपूर्वी व्ही एस वाकणकर यांना सापडले होते. त्यानंतर, हजारो संशोधकांनी त्या साइटला भेट दिली आहे, परंतु हा दुर्मिळ जीवाश्म सापडला नाही.
भीमबेटका आहे कुठे?
- भीमबेटका मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे.
- भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे.
- भीमबेटका ही एक पुरातन जागा आहे
- ते जागतिक वारसा स्थानही घोषित करण्यात आले आहे.
- भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात.
- सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी, असा अनेकांचा तर्क आहे.
पाहा व्हिडीओ: