Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

पाच महिन्यांच्या तीराला मिळणार इंजेक्शन; पंतप्रधान मोदींकडून कर माफ

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

February 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
teera kamat

मुक्तपीठ टीम

 

मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या ५ महिन्यांच्या मुंबईतील तीराच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर अथक प्रयत्नानंतर तिच्या उपचारासाठी परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ करण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने त्वरित घेतल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

 

तीरा कामत या चिमुकलीला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. कामत कुटुंबियांना लोकसहभागातून १६ कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यातही एक अडचण उभी राहिली. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रूपये आणखी खर्च येणार होता.

 

Sincere gratitude to Hon PM @narendramodi ji for your humanitarian and extremely sensitive approach towards exempting all the taxes (approx ₹6.5 crore) for importing the life saving drug for Mumbai’s 5 month old Teera Kamat!
I wish Teera a speedy recovery & healthy life! pic.twitter.com/wxT8PsnSx5

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 9, 2021

 

त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, ९ फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला.

 

मुंबईतील रुग्णालयात तीरा कामतवर उपचार सुरू आहेत. तीरा एसएमए टाइप १ आजाराशी झगडत आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे मुलीचे आयुष्य केवळ १८ महिन्यांपर्यंत असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी अमेरिकेतील हे इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून देखील कामत कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Tags: Central Government Of Indiadevendra fadnavisMaharashtraPM Narendra modiPMOआरोग्य मंत्रालयकरमाफीकेंद्र सरकारतीरा कामतदेवेंद्र फडणवीस
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले, लवकरच पेट्रोलचं शतक!

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद

Next Post
Maharashtra-BJP-leader-Devendra-Fadnavis-770x433

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!