मुक्तपीठ टीम
राज्यातील छोटी शहरं आणि ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने सामान्यांना खूप हाल सोसावे लागतात. काहीवेळा तर ते जीवघेणे म्हणावे असेही असतात. त्यावर उपाय म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने संपूर्ण राज्यभरात आरोग्य मदत कक्षांची उभारणी सुरु केली आहे. तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून थेट स्थानिक पातळीवर आरोग्य तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आजवर या कक्षाने सहाशेंपेक्षा जास्त शिबिरांचं आयोजन केले आहे. ज्याचा लाभ लाखो रुग्णांना झाला आहे.
या शिबिरांच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापुरातील करमाळ्यात नुकतेच आरोग्याचा महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्ताने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या सहकार्याने करमाळा येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न झाले. माजी आमदार नारायण आबा पाटिल, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात हृदयविकार (ई सी जी) किडणीस्टोन, कॅन्सर, नाक – कान – घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटिल, मकायी साखर कारखाना चेरमन दिग्विजे बागल, पंचायत समिती सभापती अतुल पाटील, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे, उल्हासनगर समन्वयक गणपती कांबळे , आधीराज कोठाडिया युवा नेते शंभूराजे जगताप व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होते.