मुक्तपीठ टीम
अमेरिकन मोबाईल फोन कंपनी मोटोरोलाने जी सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोटोरोलाचा हा बजेट स्मार्टफोन सध्या यूरोपातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये मिडीयाटेक चिपसेट आणि रियर मध्ये क्वाड कॅमेराचा सेटअप दिला गेला आहे. मोटो जी२२ स्मार्टफोनमध्ये ४जीबी रॅम आहे आणि यात यूजर्सला ५,०००एमएएचच्या बॅटरी क्षमतेसोबत अनेक शानदार फिचर मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि फिचर.
मोटो जी२२ स्पेसिफिकेशन
- मोटो जी२२ मध्ये ६.५ इंचचा मॅक्सविजन डिस्प्ले मिळेल.
- जो ७२०X१६०० पिक्सलच्या एचडी रिझॉल्यूशनसोबत येईल.
- डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होलसोबत ९०एचझेडचा रिफ्रेश रेट आणि २०ः९ अॅस्पेक्ट रेशो आहे.
- स्मार्टफोनमध्ये मिडीयाटेकचा हिलिओ ऑक्टाकोर चिपसेट दिला आहे.
- जो ४जीबी रॅम आणि ६४जीबी च्या इंटर्नल स्टोरेजसोबत येतो.
- या फोनमधील इंटर्नल मेमरी १टीबी पर्यंत एसडी कार्डच्या माध्यमातून आपण वाढवू शकता.
मोटो जी२२ कॅमेरा आणि बॅटरी
- मोटो जी२२ मध्ये सेल्फीसाठी अप्रतिम असा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
- रियरमध्ये ५०मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २-२ मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेंसर लावला आहे.
- हा स्मार्टफोन लेटेस्ट अॅंड्रॉइड १२ वर काम करतो.
- या फोनला पावर देण्यासाठी ५०००एमएच ची बॅटरी आणि १५ वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी मोटो जी२२ मध्ये यूएसबी सी टाईप पोर्ट, ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ वी५, एक ३.५ एमएमचा ऑडिओ जॅक दिला आहे.
मोटो जी२२ स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्लेः ६.५इंच ७२०-१६००
- प्रोसेसरः मिडीया टेक हेलिओ जी३७
- ओएसः अॅंड्रॉइड १२
- रॅम- ४जीबी
- स्टोरेजः ६४जीबी
- फ्रंट कॅमेराः १६एमपी
- रियर कॅमेराः ५०एमपी प्लस ८एमपी प्लस २एमपी प्लस २ एमपी प्लस २एमपी
- बॅटरीः ५०००एमएएच
मोटो जी२२ प्राइज आणि अव्हेलेबिलिटी
- मोटो जी२२ हा यूरोपमध्ये सिंगल वेरिएंटमध्ये लॉंच केला आहे.
- यात ४जीबी रॅम आणि ६४ जीबीचा इंटर्नल स्टोरेज दिलेला आहे.
- मोटो जी२२ ला १६९ यूरो अर्थात तब्बल १४,३०० रूपयांमध्ये लॉंच केला गेला आहे.
- हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन कॉस्मिक ब्लॅक, पर्ल वाइट आणि आइसबर्ग ब्लू सोबत येईल.
- मोटो जी२२ अन्य देशात लॉंच करण्यासंदर्भात कंपनीने सांगितले की, हा स्मार्टफोन लवकरच आशिया, आफ्रिका,लॅटीन अमेरिकेच्या देशांमध्ये लॉंच करण्यात येणार आहे.
- अद्याप तारीखसंदर्भात सांगितले गेलेले नाही.