मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिझाईन ट्रेनी या पदावर ३८ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) या पदावर, २२ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (आयएमएम) या पदासाठी ०५ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी २० जागा अशा एकूण ८५ जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एरोनॉटिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.२- कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.3: इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा/ एमबीए/ एमएसडब्ल्यू/ एमए/ एलएलबी/ सीए/ आयसीडब्ल्यूए असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून वय ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणताही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://hal-india.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.