मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनावर दुसरी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडीवरून त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. ईडीचे काही अधिकारी, भाजपाचे काही नेते आणि वसुली दलाल यांची युती झाली आहे. मुंबई पोलिसांकडे अरविंद भोसलेंनी तक्रार केली आहे. आता ईडीचे अधिकारी गजाआड जाणार, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेलाही धाड टाकण्याचा अधिकार!
- आज मुंबईत मोठी हालचाल आहे.
- धाडीवर धाडी पडत आहेत.
- त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे.
- आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे.
- मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे.
- आमच्या काही कार्यकर्त्यांवर ईडी नाही आता आयटीची रेड सुरु आहे.
- आयटीची भानामती चालू आहे.
- मला वाटतं की मनपा निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील.
- त्यांना आता एकच काम उरलं आहे.
- जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांवरच धाडी का पडतात?
- देशात सध्या हा एकच प्रश्न आहे की फक्त महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांना का टार्गेट केलं जात आहे.
- या देशात अन्य राज्यात कुणी मिळत नाही का? फक्त शिवसेना किंवा टीएमसीच…हे सरकारवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा घाट आहे.
- आयटी आणि ईडीला आम्ही आतापर्यंत ५० नावं पाठवली आहेत.
- पण ईडी किंवा आयटीला एक जबाबदार खासदार बोलतोय तर त्याबाबत चौकशी व्हावी असं त्यांना का वाटत नाही?
महाविकास आघाडीच्या १४ लोकांवर कारवाई
- किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याबाबत १०० बोगस कंपन्यांची यादी दिलीय.
- कुणी ढवंगाळे आहेत, ते भाजपच्या जवळ आहेत.
- त्यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी पाठवली आहे.
- त्याचं काय झालं? ईडीच्या सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रात झालीय.
- आतापर्यंत महाविकास आघाडीच्या १४ लोकांवर कारवाई झालीय.
- भाजपाच्या लोकांवर आयटी किंवा ईडीची रेड का नाही? ते लोक काय रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?
तुम्ही मला अटकही करु शकता…
- मागच्या पत्रकारिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवर यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
- बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती आठ हजार कोटींच्यावर गेली आहे.
- आता ती व्यक्ती मलबार हिलला राहत आहे.
- ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाही आहेत.
- याची माहिती मी लवकरच तुम्हाला देईल.
- दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भाजपाच्या नेत्याची संपत्ती त्याच्याकडे आहे हे मी आधी पंतप्रधानांना सांगणार आणि त्यानंतर तुम्हाला.
- ट्रायडेन्ट ग्रुपला आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाची कामे मिळत होती त्याची माहितीही माझ्याकडे आहे. ही माहिती मी तपास यंत्रणांना देणार आहे.
- त्यानंतर तुम्ही मला अटकही करु शकता.
ईडी भाजपाची एटीएम मशीन!
- ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत.
- ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे.
- त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे.
- मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे.
- तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे.
- मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे.
- अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १३ पानी पत्र लिहिलं…
- ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे.
- याबाबत मी २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.
- या पत्रामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे.
- ज्या ईडी ला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे.
- हा आजचा एक भाग आहे.
- किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट बनले असून ठराविक लोकांना टार्गेट केलं जातंय.
- ईडीकडून व्यावसियाकांना, बिल्डरांना धमकाविण्याचे काम सुरू आहे याबाबत पंतप्रधान मोदींना १० भागांमध्ये पत्र लिहणार आहे, पर्दाफाश केल्यानंतर आम्हाला अटकही करू शकता, लवकरच सगळ्यांचा पर्दाफाश करू असे.
आम्ही पण एक धाड टाकतोय. - मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये छापे पडतील.
नवलानी आणि सोमय्यांचा संबंध काय?
- २०१७ मध्ये ईडीनं दिवाणा हाऊंसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली.
- जितेंद्र नवलानीला २५ कोटी ट्रान्सफर झाले.
- मग ३१ मार्च २०२२ पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले.
- अविनाश भोसलेंची चौकशी झाली.
- मग भोसलेंकडून १० कोटी ट्रान्सफर केले नवलानीला, नवलानीच्या सात कंपन्यांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले.
- १५ कोटी रुपये अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले.
- अनसिक्युअर्ड ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले.
- फक्त नवलानीच नाही, तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश चैक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय.
- ईडीच्या कोणत्या अधिकारीच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन.
- नवलानी कोण आहे? सौमय्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे?
देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सर्वात मोठं रॅकेट!
- ईडीचे मोठे अधिकारी या नवलानीसोबत कसे जोडले गेले आहेत.
- पब्लिक सेक्टर बँकेचे कर्ज न फेडणारे लोक नवलानीला कसले पैसे देतात? तर कसली कन्सलटन्सी देतात?
- हा सगळा पैसे दिल्ली आणि मुंबईत बसलेल्या ईडी ऑफिसरला दिला जात आहे.
- या पैशांनी बाहेर परदेशात जमीन खरेदी केली जाते आहे.
- आणि आता आमच्या लोकांचे एक दोन तीन लाखांचे व्यवहार पाहत आहेत.
- तुमचं ट्रान्झॅक्शन कोण पाहणार आहे?
- हे मी हवेत बोलत नाहीय.. कागदपत्र दिले आहेत.
- देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे.
- मविआच्या लोकांना चुचकारण्याचं काम जे होतंय.
- हेही याच रॅकेटचा भाग आहे.
- ही फक्त १० टक्के गोष्ट आहे.
- याबाबत एक अहवालही समोर आला आहे.
- व्हिजिलन्स रिपोर्ट समोर आला आहे.
- तोही मी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलाय.