मुक्तपीठ टीम
अनेक प्रकारच्या लाभदायक आणि कल्याणकारी योजना केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर चालवतात. दारिद्र्यरेषेखालील लोक आणि गरजू लोकांना थेट फायदा मिळावा हा त्यांचा उद्देश आहे. या योजनांद्वारे सरकार थेट लोकांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पाठवते. तर इतर अनेक योजनांमध्ये आरोग्य सुविधा, मोफत किंवा स्वस्त रेशन, विमा, घर बांधण्यासाठी मदत इत्यादी केली जाते. केंद्र सरकारने २०१५ मध्ये अशीच एक योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. अटल पेन्शन योजनेत आर्थिक मदत दिली जाते.
अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी
अर्ज कसा करावा
- अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वर जावे लागेल.
- आता येथे दिसणार्या एपीवाय अर्ज पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार कार्डची माहिती भरणे आवश्यक असेल.
- त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, जो येथे टाकावा.
- त्यानंतर बँक खात्याची माहिती भरा. त्यानंतर हे बँक खाते व्हेरिफाय करा, त्यानंतर हे खाते अॅक्टिव्ह होईल.
- आता प्रीमियम डिपॉझिट आणि नॉमिनीचा तपशील देणे बंधनकारक आहे.
- यानंतर ई-स्वाक्षरी करा आणि त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता आणि अटी
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे.
- बँक खाते आवश्यक आहे, जे आधार कार्डशी जोडलेले आहे.
- आधीपासून अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी नसावे.
- मोबाईल नंबर आवश्यक आहे.
अटल पेन्शन योजनेचे फायदे
- दरमहा ५ हजार रुपये पेन्शन
- आयकर सवलत उपलब्ध आहे
- गरिबांना भारत सरकारकडूनही मदत केली जाते.
अटल पेन्शन योजनेबद्दल बोलयचे झाल्यास १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोक याचा लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, तुम्हाला प्रथम त्यात गुंतवणूक करावी लागेल आणि नंतर ६० वर्षानंतर तुम्हाला पेन्शनच्या रूपात पैसे मिळतील. जर या योजनेत दरमहा फक्त २१० रुपये जमा केले तर वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
पाहा व्हिडीओ: