मुक्तपीठ टीम
अभिनेत्री किशोरी शहाणे यांना मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली. मात्र अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी विजला अजूनही चित्रपटसृष्टीत एण्ट्री मिळू शकलेली नाही. यावर नाराज किशोरी शहाणे यांनी बॉलिवूडची घराणेशाहीवर थेट आरोप केला आहे. आता बॉलिवूडमध्ये करिअर करणे खूप कठीण झाले आहे. माझा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला व्यासपीठ मिळत नाहीये, असं किशोरी शहाणे म्हणाल्या.
किशोरी स्वतः या इंडस्ट्रीत ३५ वर्षांपासून आहेत पण आजचे प्रसिद्ध सेलिब्रिटी नवीन टॅलेंटला संधी देत नाहीत याची त्यांना चीड आहे. त्या म्हणाल्या की, “माझे पती दीपक बलराज यांनी अनेक नवोदितांना ब्रेक दिला. यात अभिनेत्यांसह गायकांचाही सहभाग होता, निदान माझ्या मुलाला तरी संधी द्या.
किशोरी म्हणाल्या की, “माझा मुलगा लहानपणापासूनच थिएटर करत आहे. बॉबीचं काम पाहून त्याला चांगला ब्रेक दिला पाहिजे, असे आम्हाला वाटते. आम्ही एवढा काळ या सिनेसृष्टीत घालवला आता निदान माझ्या मुलाला तरी व्यासपीठ मिळायला हवं. तसेच किशोर यांना घराणेशाही मान्य नाही.
संधी मिळत नाही हे पटल नाही करण गायकाचा मुलगा गायक, डॉक्टर चा मुलगा डॉक्टर किंवा अभिनेत्याचा मुलगा अभिनेता च झाला पाहिजे असा काही आग्रह नाही जर दुसऱ्या ही क्षेत्रात त्याना करियर करू द्या. आपल्या सारख्या इतके वर्ष उभा क्षेत्रात काम केलेल्या माणसाला जर हा अनुभव असेल तर जे नवीन मूल संघर्ष करत आहेत त्यांची के अवस्था आहे याचा विचार करा. आपण काय मुलाला लॉन्च करण्यासाठी producation हाऊस काढू शकता ज्यांचं कोणीच नाही त्यांचे साठी आपण हे विचार मांडायला हवे होते.