मुक्तपीठ टीम
खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा – १५० वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलनात भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. हिंदुह्रदयसम्राटची पदवी फडणवीसांना दिल्यानंतर नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे, त्यामुळे हा वाद विकोपाला जाणार का हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
हिंदूह्रदयसम्राट ही पदवी फडणवीस साहेबांना…
- ‘खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात.
- पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे.
- कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे.
आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार?
अहो आपण ज्या राज्यामध्ये फिरतोय, ज्या मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तर ज्या मतदार संघात मतदान करताय, राहताय, जगताय तिकडचाच आमदार मंत्री म्हणून जर अंडरवर्ल्डचा दाऊद, त्याच्या सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करत असेल त्याचे पैसे ठेवत असेल त्याच्या पैशामुळे प्रॉपर्टी घेत असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या पैसे घेतल्यानंतर मुंबईतून बॉम्ब ब्लास्ट होत असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?
आदित्य ठाकरेंची पुन्हा एकदा खिल्ली उडवली…
- बाळासाहेब ठाकरे यांच्या एका डरकाळीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आवाज पोहचायचा.
- त्यांच्या वारसांचा आवाज काय हालचाली काय? यांना वाघ कसं म्हणायचं, मॅव मॅव केल मी तर काय चुकीचे आहे, वाघाचे मांजर झालं आहे.