उदयराज वडामकर/कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महावितरण समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज “बारावा दिवस” आणि “सरकारचा बारावा” शेतकर्यांनी मुडन केले .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या ,वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा ,वाढीव बिलाची दुरुस्ती आदी मागण्या सह महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केले आहे .
काही शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवून दिले,पदयात्रा काढली,तर सायकल फेरी , कोल्हापूर जिल्ह्यात चक्का जाम करत असताना आज सरकारचा निषेध व्यक्त करीत शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून सरकारचे बारावी घातले. राज्यात भडका उडतो की काय अशी शंका वर्तवण्यात येत आहे .तसेच आंदोलनकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतळा जाळला ही जाळुन निषेध व्यक्त केला होता.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी केला आहे .
आंदोलन कत्याची जेवणाची सोय आंदोलनस्थळी करण्यात आली आहे .महावितरणच्या आवारात जेवण तयार करून आंदोलकांना दिले जाते .शेतकरी बांधवांनी आंदोलन स्थळी हजेरी लावून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.