Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईतील पारसिक हिल्सच्या पायथ्याशी पहिलं हॉटेल, इंडियन हॉटेल्सचे नवी मुंबईत आलिशान ‘विवांता’

March 6, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Vivanta Hotel

मुक्तपीठ टीम

भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) विवांता नवी मुंबई, तुर्भे येथे हॉटेल सुरु करत असल्याची आज घोषणा केली. पारसिक हिल्सच्या पायथ्याशी वसलेले, अतिशय शैलीदार पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले हे हॉटेल नवी मुंबईतील पहिले ‘विवांता’ आहे.

 

आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल यांनी सांगितले, “देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली उपस्थिती अधिकाधिक मजबूत करण्याच्या आयएचसीएलच्या धोरणाला अनुसरून आम्ही हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) असलेले नवी मुंबई हे व्यापारी, शैक्षणिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. हे हॉटेल नवी मुंबई शहराच्या वेगवान उत्क्रांतीचा एक भाग बनेल अशी आमची आशा आहे.”

 

१४६ खोल्यांच्या विवांता नवी मुंबई, तुर्भे मधून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. नवी मुंबई परिसरात स्थलांतरासाठी येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांपासून प्रेरणा घेऊन या हॉटेलचा आधुनिक वास्तुकलेचा आराखडा रचण्यात आला आहे. या हॉटेलमधील मिंट या संपूर्ण दिवसभर सुरु असणाऱ्या डायनरमध्ये अनेक स्थानिक व जागतिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. गोडाच्या पदार्थांसाठी स्विर्ल आहे जिथे उत्तम पेस्ट्रीज, केक यांचे अनेक स्वादिष्ट प्रकार चाखायला मिळतील. विंक या आधुनिक, आरामदायी आणि ट्रेंडी रेस्टो-बारमध्ये छान वेळ घालवता येतो. अनेक पुरस्कारांनी नावाजण्यात आलेला जिवा स्पा या हॉटेलच्या रुफटॉपवर उपलब्ध करवून देण्यात आला आहे. तसेच रुफटॉप बार व लाउंजची सुविधा देखील आहे. तब्बल ३२७ चौरस मीटर बँक्वेट परिसर असलेले हे हॉटेल लग्न आणि इतर समारंभांसाठी अगदी योग्य आहे.

 

विवांता नवी मुंबई, तुर्भेचे महाव्यवस्थापक श्री. विकास परीमू म्हणाले, “आयटी कॉर्पोरेट पार्क्स, मनोरंजनाची विविध ठिकाणे, जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा, मोठमोठे समारोह ज्याठिकाणी आयोजित केले जातात अशी मैदाने यांच्यापासून अगदी सहज पोहोचण्याजोग्या अंतरावर असल्यामुळे विवांता नवी मुंबई, तुर्भे खूपच सोयीचे आहे. सुट्टीमध्ये मौजमजा आणि आरामासाठी असो किंवा कामासाठी प्रवास करत असलेल्यांसाठी असो, हे हॉटेल सर्वांसाठी अतिशय सुविधाजनक ठरेल. नवी मुंबई शहराचे नवे आकर्षण विवांता नवी मुंबई, तुर्भेमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

हे नवे हॉटेल सुरु झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आयएचसीएलच्या हॉटेल्सची संख्या १२ वर पोहोचली आहे, यापैकी तीन हॉटेल्सचे काम सुरु आहे

 


Tags: General Manager Shri. Vikas Parimugood newsIndian Hotels Companymuktpeethnavi mumbaiPersian HillsVivanta Hotelइंडियन हॉटेल्स कंपनीचांगली बातमीनवी मुंबईपारसिक हिल्समहाव्यवस्थापक श्री. विकास परीमूमुक्तपीठविवांता हॉटेल
Previous Post

कोयना परिसरातील तापोळा-बामणोलीचं पर्यटन महत्व वाढणार, एकात्मिक पर्यटनासाठी विकास आराखड्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Next Post

मुंबईत फॉर्म्युला-१ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

Next Post
Power Boat

मुंबईत फॉर्म्युला-१ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!