मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये फायरमॅन या पदासाठी १२० जागा, फार्मासिस्ट या पदासाठी १ जागा, पेस्ट कंट्रोल वर्कर या पदासाठी ६ जागा अशा एकूण १२७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- फायरमन – १०वी पास
- फार्मासिस्ट- १०वी पास
- पेस्ट कंट्रोल वर्कर- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वेस्टर्न नेव्हल कमांड भरतीसाठी अर्ज कसा करावा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि “द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वार्टर वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – ४००००१” या पत्त्यावर रीतसर नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवू शकतात.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.joinindiannavy.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.