मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीने राज्यपालांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे त्यांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटपावं लागलं. राज्यपालांच्या या वागणुकीवर आघाडी सरकारकडून सडकून टीका केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महारांजांच्या नावाने घोषणा देणे राज्यपालांना आवडत नाही का?- विजय वड्डेटिवार
- मला कळत नाही छत्रपती शिवाजी महारांजांच्या नावाने घोषणा देणे राज्यपालांना आवडत नाही का?
- महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी अधिवेशन होते छत्रपती शिवाजी महारांज थोर पुरुषांच्या नावाने घोषणा होतात.
आम्ही राज्यपालांच्या विरोधात घोषणा दिल्या का? तर नाही. - ज्यावेळेस माननीय राज्यपालांचे आगमन झाले तर स्वाभाविक आहे शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा होत असतात.
- अशावेळी त्यांनी पहिली लाईन वाचली आणि विरोधकांकडून नवाब मलिकांच्या विरोधात घोषणा सुरु झाल्या, त्यामुळे राज्यपाल महोदयांचा जळफळाट झाला.
- नवाब मलिकांच्या संदर्भात घोषणा देणे त्यांना आवडलं नाही.
- आणि म्हणून त्यांनी शेवटचं वाक्य वाचून ते निघाले.
- इतक्या वेगाने निघाले की आम्ही अचंबित झालो की झालं काय?
राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, जयंत पाटील
- जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला.
- मात्र, राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.
- इतकेच नाही, तर ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- मात्र, राज्यपाल राष्ट्रगीतावेळी उपस्थित होते. तसा व्हिडिओही समोर आला आहे.