मुक्तपीठ टीम
आतापर्यंत रस्ते दाखवण्यासाठी जगभर लोकप्रिय असणारं गुगल मॅप्स हे अॅप आता कमाईचंही साधन ठरणार आहे. या अॅपद्वारे पैसेही कमवता येणार आहेत.
गुगल मॅपवरून कशाप्रकारे मिळवता येणार पैसे?
- गुगल मॅप्सवरून पैसे कमवण्याचा कोणताही थेट मार्ग नाही, तर दोन साइड नोकर्या आहेत ज्या गुगल मॅप्सवरून पैसे कमवण्यास मदत करतील.
- पहिली नोकरी म्हणजे मॅप अॅनालिस्ट ऑनलाइन संशोधन करून आणि तुम्हाला प्रदान केलेल्या गाईन-लाइन्सचा संदर्भ देऊन मॅपमधील माहितीची विश्वासार्हता आणि अचूकता निर्धारित करतो. लायनब्रिज ही एक कंपनी आहे जी गुगलसारख्या कंपन्यांसह मॅप, सर्च रिझल्ट आणि इतर इंटरनेट संबंधित माहिती अचूक आणि अपडेट असल्याची खात्री करण्यासाठी काम करते. यामध्ये प्रति तास ७५६ ते १,२११ रूपयांपर्यंत मिळतात.
- दुसरी नोकरी म्हणजे ऑनलाइन मार्केटिंग कंसल्टेंट- ऑनलाइन मार्केटिंग कंसल्टेंट लहान व्यवसायांमध्ये अधिक ग्राहक आणण्यासाठी एसईओ, जाहिराती आणि यूजर्सद्वारे कंटेंटचा वापर करतात. हे लहान व्यवसायांना ऑनलाइन ओळख मिळण्यास आणि अधिक ग्राहक मिळविण्यात मदत करू शकते.
गुगल मॅप्सच्या लोकल गाइड पॉइंटविषयीची माहिती
- गुगल मॅप्स यूजर्सना नेव्हिगेशनल प्लॅटफॉर्म अधिक उपयुक्त आणि अचूक बनवण्यासाठी योगदान देण्यासाठी पॉइंट देते.
- गुगल मॅप्स अशा लोकांना पॉइंट देते जे त्यांचे अनुभव रिव्ह्यूसह सामायिक करतात, फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात, त्यांची मते मांडतात, ठिकाणाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि माहिती अपडेट करतात.
- मिसिंग लोकेशन जोडतात किंवा तथ्य तपासणीद्वारे माहिती व्हेरिफाय करतात.
- वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पॉइंट दिले जातात. उदाहरणार्थ, रिव्ह्यू लिहिल्यास १० गुण मिळतात तर, एखाद्या ठिकाणच्या डिटेल्स एडिट केल्यास केवळ ५ गुण मिळतात.
वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पॉइंट दिले जातात, जसं की…
- रिव्ह्यू १० गुण
- रेटिंग १ पॉइंट
- फोटो ५ गुण
- फोटो टॅग ३ पॉइंट
- व्हिडीओ ७ गुण
- उत्तर १ गुण
- प्रश्नोत्तर प्रतिसाद ३ गुण
- एडिट ५ गुण
- स्थान जोडणे १५ गुण
- रस्ता जोडणे १५ गुण
- तथ्य तपासणी १ गुण