Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्री अंबाबाईची ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती! कोल्हापूर सराफ व्यापारी संघ मिरवणुकीनं देवस्थान समितीला सोपवणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Silver idol of Shri Ambabai weighing 51 kg by Kolhapur Saraf Traders Association

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ किलो वजनाची श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च २०२२ रोजी विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले आहे.

Silver idol of Shri Ambabai weighing 51 kg by Kolhapur Saraf Traders Association

या संदर्भात अधिक माहिती देताना कुलदीप गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

 

ते म्हणाले, एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी.

Silver idol of Shri Ambabai weighing 51 kg by Kolhapur Saraf Traders Association

यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.

 

४ मार्चला महायज्ञ

दरम्यान, मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपामध्ये मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सहकुटुंबे सहभागी होणार आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Anil PotdarJitendra RathodSanjay Jainअनिल पोतदारअंबाबाई प्रतिमाकुलदीप गायकवाडजितेंद्र राठोडसंजय जैन
Previous Post

पुणे हायवेवर भाजीविक्रीचे कष्ट, मृदुलाचं ध्येय आभाळाएवढं!

Next Post

‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’मध्ये रंगणार जाज्वल्य ऐतिहासिक सोहळा! संगीतमय शिवचरित्र, गोंधळ, शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक!!

Next Post
Sangeet Shivswarajyagatha new song will be released on the occasion of 'Marathi Rajbhasha Dina

'छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल'मध्ये रंगणार जाज्वल्य ऐतिहासिक सोहळा! संगीतमय शिवचरित्र, गोंधळ, शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!