मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसतून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मलिकांवर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपाकडून मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीस दांपत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेत काही गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांनी ट्वीट करून फडणवीस दांपत्यांवर तीन वर्षात कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मिटकरीचं ट्वीट
4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? pic.twitter.com/7DJ1RiajEV
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 23, 2022
- मिटकरींनी ट्वीट करत फडणवींसावर निशाणा साधला आहे.
- ट्वीटमध्ये त्यांनी ३ वर्षांपूर्वी ईडीकडे देण्यात आलेल्या अॅक्सीस बँकप्रकरणाची तक्रारीचा पुरवा सादर केला आहे.
- ते म्हणाले की, ४ सप्टेंबर २०१९ म्हणजे ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी अॅक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला त्याचा हा पुरावा.
- या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही . ईडीने कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय ? ‘ , असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
मिटकरींचा भाजपाला इशारा
- अमोल मिटकरी यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
- ही अटक बेकायदेशीर आहे, अनिल देशमुखांनाही असंच फसवलं पण शेवटी काहीच साध्य झालं नाही.
- यातूनही होणार नाही. कितीही त्रास द्या, आता जीव गेला तरी चालेल पण भाजपाला सोडणार नाही, असा थेट इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.