मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात एसएससी ऑफिसर पदाच्या एक्झिक्युटिव ब्रांचमध्ये एसएससी जनरल सर्व्हिस (जीएस/ एक्स)/ हायड्रो कॅडर, एसएससी नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (एनएआयसी), एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एसएससी ऑब्जर्वर, एसएससी पायलट, एसएससी लॉजिस्टिक्स अशी पदं आहेत. तर, एज्युकेशन ब्रांचमध्ये एसएससी एज्युकेशन पद आहे आणि टेक्निकल ब्रांचमध्ये एसएससी इंजिनीरिंग ब्रांच, एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच या पदांवर एकूण १५५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- एक्झिक्युटिव ब्रांच- ६०% गुणांसह बीई/ बी.टेक/ बी.एससी/ बी.कॉम/ एम.एससी (कॉम्प्युटर/ आयटी)/ बी.एससी (आयटी)/ एमसीए/ एमबीए/ पीजी डिप्लोमा
- एज्युकेशन ब्रांच- प्रथम श्रेणी एम.एससी/ बीई/ बी.टेक
- टेक्निकल ब्रांच- ६०% गुणांसह बीई/ बी.टेक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.