Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नवाब मलिकांमागे ईडी पिडेनं आठवले देवेंद्र फडणवीसांचे दिवाळीनंतरचे ‘आरोप स्फोट’

February 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis-nawab malik

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अखेर ईडीची कारवाई सुरु झाली आहे. त्यांच्या चौकशीमागे नेमके कारण काय यावर चर्चा सुरु झाली आहे. त्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे. तसेच त्या प्रकरणी अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीत जमीन व्यवहाराचा उल्लेख आल्याने मलिकांकडे ईडी पोहचल्याचं सांगण्यात येतं. जमीन व्यवहाराचं प्रकरण तेच आहे जे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बाहेर काढलं होतं, असाही दावा करण्यात येत आहे.

 

देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक आरोप

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीआधी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी संपताच आरोप स्फोट घडवला आहे. त्यांनी कागदपत्रांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिकांवर खळबळजनक आरोप केला आहे. अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असणारे आणि मुंबईतील १२ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींकडून नवाब मलिकांच्या परिवाराच्या सॉलिडस कंपनीने जमीन घेतल्याचा आरोप केला आहे. ही खरेदीही अगदी २० रुपये वर्गफुट भावात अगदी स्वस्तात झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा खरेदी व्यवहार सुरु झाला तेव्हा २००३मध्ये नवाब मलिक राज्यात मंत्री होते, असेही ते म्हणाले. आरोपाच्या समर्थनार्थ असलेली कागदपत्रे संबंधित यंत्रणा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देणार असल्याते सांगितले.

 

“मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिकांची स्वस्तात जमीन खरेदी!”

  • राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या परिवाराच्या सॉलिडस कंपनीने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमची बहिण हसिना आपासाठी ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि मालमत्ता हडपण्याचे काम करणारा सलीम पटेल यांच्याकडून बाजारभावापेक्षा अगदी स्वस्तात जमीन खरेदी केली आहे.
  • कुर्ल्याच्या लाल बहादुर शास्त्री मार्गावर त्यावेळी दोन हजार वर्ग फुटाचा भाव असताना मलिक कुटुंबाच्या कंपनीने वीस रुपये वर्गफुटाने ही जमीन खरेदी केली आहे.
  •  याच भागात पाइपलाइन मार्गावर मलिक कुटुंबाने २००५मध्ये घेतली होती ती ४१५ रुपये वर्गफुटाने घेतली होती. तसेच त्याच भागातील मॉलमध्ये २०५० रुपये वर्गफुटाचा भाव होता, असे फडणवीस यांनी सांगितले.
  • सध्या फक्त एकाच जमीन व्यवहाराची माहिती देत आहे. लवकरच आणखी काही व्यवहार उघड करणार आहे.
  • हा जमीन खरेदी व्यवहार सुरु झाला तेव्हा नवाब मलिक राज्यात मंत्रीपदी होते. पुढे व्यवहार पूर्ण होण्याआधी त्यांच्या न्या. सावंत आयोगाने आक्षेप ठेवल्याने त्यांचा राजीनामा झाला.

मलिकांनी खरेदी केलेली जमीन विकणारे अंडरवर्ल्डवाले कोण, त्यांची माहितीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरदार शहाबअली खान

  • सरदार शहाबअली खान १९९३ बॉम्बस्फोटमधील आरोपी
  • सध्या त्या प्रकरणात जन्मठेप भोगतो आहे.
  • टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग, स्टॉक एक्स्चेंज, मुंबई मनपा मुख्यालयात बॉम्बहल्ल्याची रेकी, टायगर मेमनच्या घरी कटाच्या बैठकीत सहभाग, अलहुसैनी या टायगरच्या घरी गाडीत आरडीएक्स भरण्यात, बॉम्ब कुठे ठेवायची याची रेकी झाली होती, त्यात तो होता.

 

सलिम पटेल

  • दुसरा विक्री करणारा सलिम अली खान हा दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड.
  • सलिम पटेल हा एका इफ्तार पार्टीत सोबत फोटोत दिसल्याने दिवंगत आर आर पाटील हे वादात सापडले होते, त्यांचा दोष नव्हता.
  • त्यावेळी दाऊदचा साथीदार असा उल्लेख झाला तो हाच सलिम पटेल.
  • २००७मध्ये हसीना पारकरसोबत सलिमला अटक झाली होती.
  • हसीना पारकरच्या नावाने मालमत्ता जमा होत होत्या, तो करणारा सलिम पटेल होता.
  • जमीन हडपण्याच्या बिझनेसमध्ये प्रमुख सलिम पटेल होता.

 


Tags: devendra fadnavisEDnawab mailkईडीदेवेंद्र फडणवीसनवाब मलिक
Previous Post

केंद्र शासनाच्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत सकारात्मक – राज्य अर्थमंत्री शंभुराज देसाई

Next Post

राम कदम म्हणतात, ईडीची कारवाई वाईट कृत्याच्या विरोधात! भातखळकरांची विचारणा, सूडाचं राजकारण कोणाचं?

Next Post
ram kadam & atul bhatkhalkar nawab malik

राम कदम म्हणतात, ईडीची कारवाई वाईट कृत्याच्या विरोधात! भातखळकरांची विचारणा, सूडाचं राजकारण कोणाचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!