मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी कबिरा मोबिलिटीने दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही बाईक्स १५ फेब्रुवारी २०२१ रोजी देशात लॉन्च केल्या जातील. ज्यांची नावे केएम ३००० आणि केएम ४००० असतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ही बाईक लाँचिगपूर्वीही बुक करता येत आहे.
केएम ३००० ही फुली फेयर्ड इलेक्ट्रिक स्पोर्टबाईक असेल. तर केएम ४००० ही नेक्ड इलेक्ट्रिक स्ट्रीट बाईक असेल. फास्ट ऑनबोर्ड चार्जिंग, पार्क असिस्ट, फायरप्रूफ बॅटरी या सुविधाही या बाईकमध्ये असतील.
या इलेक्ट्रिक बाईक्सला आधुनिक डिझाईन दिले जाईल. यासह बाईकमध्ये डेल्टाईव्ही बीएलडीसी हब इलेक्ट्रिक मोटर वापरली जाईल. नवीन केएम ३००० आणि केएम ४००० या बाईक सिंगल चार्जवर १५० कि.मी. राइडिंग रेंज ऑफर करणार आहे. त्यांची सर्वात वेगवान गती १२० कि.मी. प्रतितास असल्याचे सांगण्यात आले आहे.
कबिरा मोबिलिटीने मागील वर्षी २०२० मध्ये ऑटो एक्सपोमध्ये आपली उत्पादनं मांडण्याची सुरुवात केली. कंपनीने कॉलेजिओ, कॉलिजिओ निओ, कॉलेजिओ प्लस, इंटरसिटी एओलस, इंटरसिटी निओ आणि एटोस १०० अश्या ६ इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत.
ही स्कूटर २४ कि.मी. प्रति तासाचा वेग आणि ९०-१०० कि.मी. च्या रेंजसह येते. कबिरा मोबिलिटीला भविष्यात बाईकसह अन्य उत्पादनांकडेही वळायचे आहे. सध्या कबिरा गोवा आणि धारवाडमध्ये आपली वाहने तयार करते. तेथेच कंपनी नवीन प्रॉडक्शन प्लांटही तयार करीत आहे.
पाहा व्हिडीओ