मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार उमा भारती यांनी अखेर आपल्या मनातील दु:खाला मोकळी वाट करून दिली आहे. राज्यातील केन-बेतवा नदी जोडणी प्रकल्प मंजूर झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, पण पण त्यांच्या कामाचे श्रेय मिळत नाही हे त्यांच दु:ख: आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, “सरकार मी बनवते, चालवतं दुसरंच कुणी!”
२००३ मध्ये अजामीनपात्र वॉरंटमुळे उमा भारती यांना मध्यप्रदेशचं मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. आधी बाबुलाल गौर त्यानंतर शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. त्यानंतर उमा भारती यांनी भारतीय जनशक्ती पक्षाची स्थापना केली आणि निवडणूकही लढवली. २०१४मध्ये त्या भाजपातर्फे खासदार झाल्या. पंचप्रदान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाात त्या केंद्रात मंत्रीही होत्या. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळाले नाही. आता त्या कोणत्याही पक्षात नाहीत, असं सांगतात.
सरकार मी बनवते, चालवतं दुसरंच कुणी!
- माझ्यासोबत आनंद योग घडत आहे.
- ललितपूर ते सिंगरौली दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पायाभरणी झाली तेव्हा मी भाजपामध्ये नव्हती.
- केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसवाल्यांनी माझे नाव घेतले नाही.
- उद्घाटन झाले तेव्हा भाजपाच्या लोकांनी माझे नावही घेतले नाही.
- केन-बेतवाची पायाभरणी होईल, तेव्हा प्रोटोकॉलचा प्रश्न निर्माण होईल. म्हणूनच मी आधीच सांगतेय की हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, त्यातच मी आनंदी आहे.
केन-बेतवा होणं महत्वाचं…श्रेय नाही!
उमा भारती यांनी या प्रकल्पाच्या श्रेयाबद्दल एक कथा सांगितली. एका मुलावर दोन आईंनी हक्क सांगितला. राजा म्हणाला की आम्ही ही अडचण दूर करू. मुलाचे दोन तुकडे करा आणि दोन्ही तुकडे दोघींना द्या, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर खरी आई म्हणाली की मला नको, दुसरीला द्या. नकार देणारी आईच खरी आई आहे अशी निवाड राजाने केली. मूल जिवंत राहिले म्हणजे झाले. केन-बेतवा आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कदाचित केन-बेतवाची पायाभरणी होणार असेल, तर मला स्टेजवर राहता येणार नाही. प्रोटोकॉलचे अडथळे दूर होतील असे वाटत नाही.
२०२४ मध्ये निवडणूक लढवणार!
- उमा भारती या २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार
- त्या कोणत्या पक्षातून लढणार, याचे उत्तर त्यांनी सांगितले नाही.
- मी २०१९ ची निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते, पण मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे कधीच म्हटले नाही.