मुक्तपीठ टीम
भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने मुंबई शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
या स्पर्धेत प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडीओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा एकूण पाच स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी १५ मार्च पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/