मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात आता शिवसेनेने वेगळीच रणनीती ठरवली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच त्यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करून कारवाई करण्यासाठी ईडीकडे कागदपत्रे दिली होती. आता त्या तक्रारीचे काय झाले हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार येत्या दोन-तीन दिवसांत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संचालकांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
सोमय्यांच्या आरोपांच्या चौकशीचे पुढे काय झाले?
- नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांचा उल्लेख केला.
- राऊत म्हणाले, सोमय्यांनी राणे आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.
- ते म्हणालेले, राणे कुटुंबीयांच्या नावे अनेक कंपन्या नोंदविण्यात आल्या आहेत.
- किरीट सोमय्या यांनीच राणेंच्या गैरव्यवहाराबाबत आरोप करून ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.
- त्यानुसार चौकशी सुरू झाली होती.
- त्या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.
- या तक्रारीचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याकरिताच ईडीच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राऊतांनी नेमकं काय दाखवलं ध्वनिचित्रफीत?
- आमदार राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर रेल्वे स्थानकावर जीवघेणा हल्ला झाला होता.
- त्यावेळी त्यांनीही नितेश राणे यांच्यावर आरोप केले होते.
- सोमय्या यांनी शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती नसावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.
- किरीट सोमय्या आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत नितेश राणे यांनी केलेल्या मराठीविरोधाच्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीतही राऊत यांनी सादर केली.