मुक्तपीठ टीम
संजय राऊत – किरीट सोमय्या सामन्यातील एक महत्वाचा वादाचा मुद्दा रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील ठाकरे आणि वायकर यांच्या एकत्रित मालमत्तांचा आहे. तेथे ठाकरेंचे १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. संजय राऊतांनी त्यांना आव्हान देत ते बंगले दाखवाच, असे आव्हान दिले होते. त्यावर सोमय्यांनी कराची कागदपत्र दाखवत प्रतिआव्हान दिले होते. आता मात्र कोर्लई गावच्या सरपंच प्रशांत मिसळ यांनी पुढे येत किरीट सोमय्या म्हणतात तसे बंगले नसल्याचा दावा केला आहे. तसेच सोमय्यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या ज्या माफीनाम्याचा उल्लेख केला तो माफीनामाही नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.
सरपंच प्रशांत मिसळ काय म्हणाले?
- किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत ते खोटे आहेत.
- कोर्लई गावात प्रत्यक्षात १९ बंगले नव्हते, १८ बंगले होते. २००९ ला अन्वय नाईक यांनी रिसॉर्ट बांधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी कच्ची घरं उभारली.
- पण तो जो प्लॉट आहे तो संपूर्ण सीआरझेडमध्ये येत असल्यामुळे त्यांना कलेक्टरने मंजूरी दिली नाही.
- त्यामुळे २०१३-१४ मध्ये त्यांनी ती घरं पाडली.
- आणि झाडांची लागवड करून ती २०१४ ला रश्मी ठाकरे, मनिषा वायकरांनी विकली.
- २०१४ला जो टॅक्स थकीत होता तो २०१९ मध्ये भरण्यासाठी आम्ही विनंती केली.
- आणि त्यांनी तो १८ हजारांचा जो टॅक्स आहे तो ऑनलाईन आरटीजीएस मार्फत ग्रामपंचायतीला भरणा केलेला आहे.
- २०२१ ला आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तिथे एकही घर आढळून न आल्यामुळे आम्ही ते कर आकारणी समितीच्या पुढे ठेवून आम्ही ते संपूर्ण घरं रद्द केलेली आहेत.
- आणि तिथे कुठल्याही प्रकारचं एकही घर नाही आहे.
- आणि जे काही किरीट सोमय्या म्हणतातय की रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला माफिनामा दिला आहे ते खोटं आहे.
- रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितली नाही.
- त्यांचे कुटुंब सुद्धा या जागेवर एकदा सुद्धा फिरकली नाहीत किंवा विचारणा केलेली नाही.
किरीट सोमय्या ‘त्या’ गावात जाणार!
- कोर्लई गावच्या सरपंचांच्या स्पष्टीकरणामुळे किरीट सोमय्या अडचणीत आल्याचे मानले जाते.
- त्यांनी ट्वीट करत १८ फेब्रुवारीला कोलई गावाला जाण्याची घोषणा केली आहे.
- १९ बंगल्यांच्या वादग्रस्त विषयाबाबत अखेर कोर्लई गावात मी जाणार आहे.
- आता कोलई गावात जाऊन पाहणी करून बंगले कुठे चोरी झाले, असा प्रश्न केला आहे.