मुक्तपीठ टीम
युक्रेनवर १६ फेब्रुवारीला रशिया हल्ला करणार असल्याचा मुहूर्त युक्रेनच्या अध्यक्षांनी जाहीर केला होता. त्यामुळे तेथे राष्ट्रीय एकता दिवस पाळला जात आहे. परंतु तेथे रशियाचा थेट हल्ला तर झालेला नाही. मात्र, प्रचंड घबराट मात्र पसरली आहे. कारण ठरलं आहे, युक्रेनमधील अनेकर सरकारी, खासगी संस्थांच्या आयटी यंत्रणांवर झालेल सायबर हल्ला! त्यासाठी रशियाकडे बोट दाखवले जात आहे.
कोणत्याही दिवशी सैनिकी कारवाई करण्यासाठी रशियाने लष्कर सज्ज ठेवलं आहे, असं अमेरिकेचे म्हणणं आहे. परंतु रशियाने आपले सैन्य आणि रणगाडे काही प्रमाणात मागे घेतले आहे. आतापर्यंत रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे किंवा गोळीबार किंवा बॉम्ब टाकल्याचे कोणतेही वृत्त नाही. तरीही युक्रेनमध्ये घबराट पसरली आहे. कारण युक्रेनवर सायबर हल्ला झाला आहे. युक्रेनने रशियावर आरोप केला आहे.
रशियानेच केला सायबर हल्ला?
- वास्तविक, लष्करी संकटादरम्यान युक्रेनवर मोठा सायबर हल्ला झाला आहे.
- संरक्षण मंत्रालय, लष्करी दल आणि दोन सरकारी बँकांच्या वेबसाइट सायबर हल्ल्याला बळी पडल्या आहेत.
- या हल्ल्यामुळे किमान १० वेबसाइट्सनी काम करणे थांबवले आहे.
- यामागे रशियाचा हात असू शकतो, असे युक्रेन प्रशासनाचे म्हणणे आहे.
- थेट हल्ल्याचे नियोजन करण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी हे निकृष्ट काम सुरू केले असावे.
संरक्षणापासून परराष्ट्र मंत्रालयापर्यंतच्या वेबसाइट ठप्प!
- युक्रेन सरकारच्या म्हणण्यानुसार, तेथे डीडीओएस सायबर हल्ला झाला आहे.
- यामुळे किमान १० वेबसाइट्सनी काम करणे बंद केले आहे.
- यामध्ये संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि मोठ्या बँकांच्या वेबसाइटचा समावेश आहे.
- युक्रेनच्या सर्वात मोठ्या सरकारी बँका आणि अनेक खाजगी बँकांचे अॅप्स देखील काम करत नाहीत आणि ऑनलाइन पेमेंट देखील शक्य नाही.
- खुद्द माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.
- मात्र, बँकांमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या निधीचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही सायबर हल्ला!
- जानेवारीमध्येही युक्रेनवर सायबर हल्ला झाला होता.
- त्यानंतर ७० वेबसाइट्सनी काम करणे बंद केले होते.
- त्यावेळी युक्रेननेही रशियावर आरोप केले होते.
- रशियाने २०१७ मध्ये युक्रेनवर मोठा सायबर हल्ला केला होता.
- NotPetya नावाच्या व्हायरसमुळे त्याने जगभरात १० अब्ज डॉलर्सचे नुकसान केले.
रशियाच्या धोरणात नरमाई!
- युक्रेनच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रशियाच्या भूमिकेतही नरमाई दिसून आली.
- रशियाने दावा केला आहे की ते युक्रेनवर आक्रमण करण्याचा आपला विचार बदलत आहे आणि सैन्य मागे घेत आहे.
- मात्र, रशियाच्या या चालीवर अमेरिकेचा विश्वास बसत नाही.
- त्याने रशियाकडे त्याच्या पुष्टीकरणाचा पुरावा मागितला आहे.