मुक्तपीठ टीम
कोरियन शास्त्रज्ञांनी रोगांशी लढण्यात उपयोगी ठरणाऱ्या एका चिपचा शोध लावला आहे. ही चिप व्यसन मुक्त होण्यास मदत करेल. तसेच नैराश्याला दूर पळवेल. ही चिप पार्किन्सन रोगाशीही लढण्यासाठीही उपयोगी ठरेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या चिपचे मेंदूत प्रत्यारोपण केले जाईल. ही ब्लूटूथच्या मदतीने मोबाईलद्वारे नियंत्रित केली जाईल.
शरीरात अशा प्रकारचे उपकरण प्रत्यारोपण केल्यानंतर काही काळानंतर बॅटरी बदलण्यासाठी पुन्हा अनेक शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु, या चिपच्या बाबतीत असे केले जाणार नाही. हे बर्याच काळासाठी कार्य करेल आणि चार्ज होत राहील.
तुम्ही जिथेही असाल तिथे मोबाईलद्वारे ही चिप ऑपरेट करू शकता. ही चिप कशा प्रकारे कार्य करू शकते हे पाहण्यासाठी, याचा प्रयोग उंदरावर केला गेला. त्यांना कोकेन हे औषध दिले गेले, यानंतर एक छोटी शस्त्रक्रिया केली आणि उंदराच्या मेंदूत एक चिप लावली गेली. लाइट स्टीम्युलेशनद्वारे प्राण्यांचे वर्तन नियंत्रण केले जाऊ शकते, असे संशोधक जेओंग-अम किम यांनी सांगितले.
द कोरिया एडवान्स्ड इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एन्ड टेक्नोलॉजीचे प्रा. जे-वूंग जिओंग म्हणतात की, “या डिव्हाइसमध्ये खूपच लहान एलईडी लाइट आहेत, जे मेंदूच्या न्यूरॉन्सवर परिणाम घडवतात. हेच कारण आहे की, शास्त्रज्ञांनी त्याचा उपयोग मेंदूशी संबंधित इतर रोगांसाठी देखील केला.”
ही वायरलेस चिप स्मार्टफोनच्या मदतीने ऑपरेट केली जाते. चिपमधून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे बॅटरी चार्ज होते. या तरंगांमुळे माणसांना नुकसान होत नाही.
पाहा व्हिडीओ