मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद अखेर पार पडली. राऊतांनी नेहमीच्या आक्रमकतेने भाजपावर हल्लाबोल केला. त्यांनी ठाकरे – राऊत यांच्यावरील आरोपांमधील फोलपणा उघड करण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांवर आरोपही केले. त्यात फडणवीस सत्ताकाळातील हरयाणातील गुंतवणूक, किरीट सोमय्यांचा मुलगा नील, फडणवीसांचे निकटवर्तीय मोहित कंबोज आणि माजी वनमंत्री भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी आरोप केले. मात्र, त्यांनीच उल्लेख करून गाजवत ठेवलेले भाजपाचे ‘ते’ साडेतीन नेते नेमके कोण, ते काही शेवटपर्यंत उघड केलेच नाही.
पत्रकार परिषद झाल्यावर पत्रकारांनीच साडेतीन नेत्यांबाबत विचारताच यथावकाश या नेत्यांची नावे उघड करणार आहे. आज तर केवळ ट्रेलर आहे, असं सांगत संजय राऊतांनी भाजपाच्या त्या साडेतीन नेत्यांची नावे उघड करण्यास नकार दिला. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण? याचं रहस्य कायम राहिलच पण राऊतांनी असं का केलं, असं नवं गूढ निर्माण झालं. या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा या सरकारी निवासस्थानाकडे रवाना झाले, हे येथे उल्लेखनीय आहे.
संजय राऊतांनी कोणावर केले आरोप?
- देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळातील गैरव्यवहार
- किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नगरसेवक निल किरीट सोमय्या
- भाजपा नेते माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
- फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज
फडणवीस सत्ताकाळात हरियाणातील दुधवाल्याकडे हजारो कोटींची गुंतवणूक
- ईडी – सीबीआयलाही आवाहन…
- ईडी – सीबीआयवाल्यांनी मी काय बोलतो ते ऐकावं.
- हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे.
- निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची.. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा भागिदार आहे!
सोमय्यांचा मुलगा पीएमसी घोटाळ्यातील राकेश वाधवानचा भागिदार!
- भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
- पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत.
- सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक आहे.
- त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत.
- त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं अॅक्शन घेतली पाहिजे. तर त्यांच्यावर कारवाई होईल.
राकेश वाधवानला ब्लॅकमेल केल्याचा आरोप!
- वसईतील मौजे गोखिवरे येथे सोमय्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि लुबाडलं.
- आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले.
- कॅशही घेतली. १०० कोटी घेतले.
- लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या.
- ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांना केली.
- अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना आवाहन!
- या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.
- आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा.
- पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला २० कोटींचा निधी गेला.
मुनगंटीवारांच्या घरच्या लग्नात नऊ कोटींचे कार्पेट
- माझ्या मुलीच्या लग्नात ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांच्याकडे अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी केली.
- फुलवाला, केटरिंगवाला, डेकोरेशनवाला आणि आता तर मेहंदीवाल्याकडे चौकशी केल्याचं मला समजलं.
- भाजपा सरकारच्या काळातही तत्कालीन वन मंत्र्यांच्या घरातील लग्नात फॉरेस्ट उभारण्यात आलं होतं.
- साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकण्यात आलं होत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
मोहित कंबोज हेही वाधवानांचे लाभार्थी, फडणवीसांना बुडवणार!
- देवेंद्र फडणवीसांचा एक फ्रंट मॅन आहे मोहीत कंबोज.
- फडणवीसांना हा कंबोज बुडवणार आहे.
- पत्राचाळमध्ये मोहीत कंबोज याचा प्रोजेक्ट सुरू आहे.
- आणि आमच्यावर भष्टाचाराचे आरोप करतोय.
- या प्रोजेक्टमध्ये पीएमसी घोटाळ्याचे पैसे लागले आहेत.
- त्याच्याकडे एवढा पैसा कठून आला, हे फक्त फडणवीसांनाच माहीत आहे.
ठाकरे-पाटणकरांवरील आरोप फोल
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाने रायगडमध्ये बंगले घेऊन १९ बंगले बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
- मी तुम्हाला बसने तेथे नेतो, कोठे आहेत बंगले?
- त्यांचे नातेवाईक पाटणकर यांनी देवस्थानाची जमीन घेतल्याचा आरोप केला गेला.
- मुळात ती जमीन ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याआधी कित्येक व्यवहार झाले, त्यानंतर पाटणकरांनी घेतली.
- माझ्यावर आरोप केले. पण माझी जी काही जमीन असेल ती माझ्या मूळ गावाताच अलिबागलाच असेल ना. ५० गुंठे जमीनीची ईडीने गरीबांची चौकशी केली. त्रास दिला.