मुक्तपीठ टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने जबानी बदलत धक्कादायक माहिती उघड केली आहे. याप्रकरणी सचिन वाझेची पुन्हा चौकशी करण्यासाठी सीबीआयनं मुंबई विशेष न्यायालयात अर्ज दाखल केलेला. आता वाझेची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात वाजेची चौकशी करण्यास परवानगी दिली. मधल्या काळात वाझेने आधीची जबानी बदलून देशमुखांविरोधातील जबानी दिल्यामुळे आता सीबीआयच्या चौकशीत नवी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. सीबीआयचा तपास त्या माहितीच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांप्रमाणेच आघाडीच्या सत्तेतील अन्य नेत्यांपर्यंत पोहचण्याची चर्चा आहे.
देशमुख यांचे माजी सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची चौकशीची परवानगी देण्यासाठी केंद्रीय एजन्सीने विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयासमोर एक वेगळा अर्जही दाखल केला होता. अर्ज स्वीकारून विशेष पीएमएलए न्यायालयाने सीबीआयला पालांडे आणि शिंदे यांची १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात चौकशी करण्याची परवानगी दिली.
नेमकं प्रकरण काय?
- परमबीर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते.
- या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप केला होता.
- त्यानंतर अनिल देशमुख यांना या खंडणीच्या आरोपात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
- तर, राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची नेमणूक केली आहे.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीपासून १०० कोटीच्या खंडणीचे आरोप फेटाळून लावले होते.
हे वाझे…
सचिन वाझेने जबानी बदलल्यानं अनिल देशमुख अडचणीत! सीबीआयनंही केली सहकाऱ्यांची चौकशी!
ते वाझे…
सचिन वाझे म्हणतात अनिल देशमुखांनी कधीच पैशाची मागणी केली नाही!