मुक्तपीठ टीम
सीबीआयकडून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघडकिस केला आहे. देशातील नामांकित स्टेट बँक ऑफ इंडियासह २८ बँकांची २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक झाली आहे. या घोट्याळ्यात सहभागी असलेल्या दोन कंपन्या या एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहेत. दोन्ही कंपन्या एकाच समूहाच्या आहेत. या घोटाळ्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी मॉडेल – लुटा आणि पळवा! रणदीप सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी मॉडेल – लुटा आणि पळवा! देशासमोर तीन तथ्य आहेत. मोदी सरकारच्या ७ वर्षात ५,३५,००० कोटी रुपयांची बँक फसवणूक झाली. देशाच्या बँकांचे ८,१७,००० कोटींचे बट्याबोळ केले आहे. बँकांच्या एनपीएमध्ये २१,००,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लुटा आणि पळवा!
या घोटाळ्याचा पैसा परदेशात पाठवून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.१८ जानेवारी २०१९ रोजी अर्न्स्ट अँड यंग एलपीने दाखल केलेल्या एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीतील फॉरेन्सिक ऑडिट अहवालाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की कंपनीने बेकायदेशीर कृतींद्वारे बँक कर्जाचा गैरवापर केला आणि निधी वळवला.
एबीजी शिपयार्ड ही एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग…
- एबीजी शिपयार्ड ही २० टन वजनाची जहाजे बांधण्याची क्षमता असलेली भारतातील सर्वात मोठी खाजगी जहाज बांधणी कंपनी आहे.
एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे.
१९८५ मध्ये स्थापन झालेल्या, याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. - गुजरातमधील सुरत आणि दहेजमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू आहे.
- ऑक्टोबर २०१० मध्ये वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडच्या अधिग्रहणानंतर, ते गोव्यात जहाज दुरुस्ती युनिट चालवते जी भारतातील सर्वात मोठी जहाज देखभाल सुविधा आहे.
- आतापर्यंत या कंपनीने १६५ जहाजे बांधली आहेत.
कोणत्या बँकेची किती थकबाकी
- स्टेट बँक ऑफ इंडिया -२,४६८.५१ कोटी
- आयसीआयसीआय – ७,०८९ कोटी
- आयडीबीआय – ३,६३४ कोटी
- बँक ऑफ बडोदा – १,६१४ कोटी
- पीएनबी – १२४४ कोटी
- आयओबी- १,२२८ कोटी