Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सनातन-हिंदू जनजागृतीचा बँक लुटून शस्त्र कारखाना, सशस्त्र सैन्याचा कट!”- सीबीआय

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: उच्च न्यायालयात स्फोटक दावा

February 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Dabholkar murder case

मुक्तपीठ टीम

२० ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विरेंद्रसिंह तावडेचा ते हिंदूविरोधी मानत असलेल्या आणि सनातन संस्थेच्या श्रद्धा आणि रूढींना विरोध करणाऱ्या लोकांना संपवण्याचा डाव होता. सनातन आणि हिंदू जनजागृतीचा त्यासाठी बँक लुटून पैसे मिळवून शस्त्र निर्मिती कारखाना उभारण्याचाही कट होता. तसंच उत्तरप्रदेश-आसामातून गावठी शस्त्र मिळवून १५ हजारांचे खासगी सैन्य उभारण्याचाही कट होता, असे स्फोटक दावे सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाला शपथपत्राद्वारे केले आहेत. आरोपी विरेंद्र तावडे याच्या जामीनाला विरोध करत सीबीआयनं आपलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं आहे.

बँक लुटून पैसा! १५ हजारांचं सैन्य! शस्त्रांचा कारखाना!

  • सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं, “गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी सारंग अकोलकरने विरेंद्रसिंह तावडेला इमेल करून सनातन संस्थेच्या कामासाठी उत्तर प्रदेश आणि आसाममधून गावठी हत्यारं मिळवून १५००० लोकांची आर्मी उभी करण्यास सांगितलं होतं.
  • आपलं ध्येय गाठता यावे म्हणून शस्त्रास्त्र कारखाना काढण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने अगदी बँक लुटण्याच्या पर्यायाचंही समर्थन केलं.”

 

सीबीआयचा आरोपींच्या जामिनाला विरोध

  • “विरेंद्रसिंह तावडेसह सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना सनातन संस्थेच्या ‘क्षात्र धर्म साधना’तील शिकवणीचं पालन आणि अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं होतं.
  • यानुसार वैचारिक विरोधकांना राक्षस, हिंदू विरोधी, धर्मद्रोही, दुर्जन असल्याचं सांगत त्यांना संपवण्यास सांगितलं जात होतं.
  • यावेळी सीबीआयने आरोपींच्या जामिनाला विरोध करत ते समाजाला मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केलं.
  • या गुन्ह्यातून आरोपींनी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्थेला न आवडणाऱ्या गोष्टींवर क्रूरपणे उत्तर दिलं जाईल असा संदेश देण्यात आला.
  • हे नागरिकांच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्यास पुरेसं कारण आहे.
  • यामुळे समाजात दहशत निर्माण होते.

 

चारही पुरोगामी नेत्यांच्या हत्यांशी संबंध!

तसेच या प्रकरणातील आरोपींचा कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने केलाय.


Tags: CBIdr narendra dabholkarmumbai high courtVirendra Singh Tawadeडॉ. नरेंद्र दाभोलकरमुंबई उच्च न्यायालयविरेंद्रसिंह तावडेसीबीआय
Previous Post

“किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल”

Next Post

“विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा”

Next Post
Varsha gaikwad

"विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!