Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई संस्कृती आभासी संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन

February 10, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mumbai Sanskriti Virtual Music Festival 2022

मुक्तपीठ टीम

इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई (IHS) तर्फे व महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ३० व्या ‘मुंबई संस्कृती’ संगीत महोत्सवाचे आभासी (virtual) आयोजन शास्त्रीय संगीत रसिकांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या कन्व्होकेशन हॉल (convocation hall) येथे करण्यात आले आहे..

 

मुंबईतील अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक वारसा स्थळांचा शोध आणि त्यांचे संवर्धन करणे हे इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई (IHS) चे मुख्य उद्दिष्ट आहे . दक्षिण मुंबईतील  ऐतिहासिक बाणगंगा तलाव प्रथमतः सुशोभिकरण व संवर्धन करण्याची मोठी कामगिरी इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई या सेवाभावी संस्थतर्फे करण्यात आली. तसेच या ठिकाणाचा पर्यटनदृष्ट्या प्रचार करण्यासाठी इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई ही १९९२ पासून ‘Live Music To Save Heritage’ या संकल्पनेवर आधारित शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन  बाणगंगा तलावाकाठी  करीत असे. तथापि २००८ पासून ध्वनिप्रदूषणाच्या कारणास्तव व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महोत्सवाचे ठिकाण बदलून एशियाटिक लायब्ररी (Town Hall) येथे करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील अजून एका ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वास्तूची  ओळख इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबईतर्फे नवीन पिढीला करून देण्यात आली.  आता हा महोत्सव संगीत रसिकांसाठी बाणगंगा महोत्सव ऐवजी  मुंबई संस्कृती या नावाने आयोजित करण्यात येत आहे.

 

सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षी देखील “मुंबई संस्कृती” महोत्सवाचे आभासी (virtual) आयोजन मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या काँव्होकेशन हॉल (convocation hall) मध्ये  करण्यात आले आहे.

 

या महोत्सवाबद्दल सांगताना इंडियन हेरिटेज सोसायटी-

मुंबईच्या अध्यक्षा अनिता गरवारे म्हणाल्या, संस्कृती आणि संगीत परंपरेचा अद्वितीय वारसा हीच आपली ओळख आहे. यासाठीच आम्ही हा कार्यक्रम वारसा स्थळी आयोजित करतो. जेणेकरून महोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सांगीतिक वारसा आपण  जतन आणि वृद्धिंगतही करू शकतो.

 

या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार कला सादर करतात. कार्यक्रमाचे आभासी सादरीकरण YouTube च्या माध्यमांद्वारे (www.youtube.com/IndianHeritageSocietyMumbai/) खालील नमूद तारखांनुसार करण्यात येणार असून रसिक प्रेक्षकांना त्याचा विनामूल्य आस्वाद घेता येईल.

 

१) शुक्रवार- ११ फेब्रुवारी २०२२- पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी वादन)

२) शुक्रवार-१८ फेब्रुवारी २०२२- संजीव चिमलगी (शास्त्रीय गायन)

३) शुक्रवार – २५ फेब्रुवारी २०२२  – अंकिता जोशी (शास्त्रीय गायन)

४) शुक्रवार – ४ मार्च २०२२ – पद्मभूषण एन. राजम (व्हायोलिन वादन)

 

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक Tata Consultancy Services, सह प्रायोजक HSBC हे असून रेडीओ पार्टनर FM Radio City हे आहेत. तसेच   कार्यक्रमाचे संयोजन हे नॉर्थन लाइट्स (Northern Lights) यांच्याद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इंडियन हेरिटेज सोसायटी  मुंबईच्या फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉलो करा. (Ph. 9920622480) /ihsmumbai @ihsmumbai www.ihsmumbai.com असे कळविण्यात आले आहे.


Tags: Indian Heritage SocietymumbaiMumbai Sanskriti 'Music Festivalइंडियन हेरिटेज सोसायटीमुंबईमुंबई संस्कृती’ संगीत महोत्सव
Previous Post

शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक

Next Post

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन

Next Post
Raj Bhavan new Durbar Hall will inaugurate by bhagat singh koshyari

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!