Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक

नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई - छगन भुजबळ

February 10, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Strict action against Shiv bhojan centre for misleading rules

मुक्तपीठ टीम 

शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

                  

मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव सुधीर तुंगार, सहसचिव चारुशीला तांबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

            

यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथके तयार करा. शिवभोजनच्या गुणवत्ते मध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे देखील भुजबळ म्हणाले.

            

शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे  नियोजित आहे. या कामासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत होती मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांकडून या कामाला थोडा अवधी वाढवून मिळावा अशी मागणी होती. हे लक्षात घेता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. अशी माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली.

            

शिवभोजन केंद्र चालकांना शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो एका अँप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे येथून पुढे हे फोटो अपलोड करण्यासाठी शिवभोजन केंद्रापासून १०० मिटर ही मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे शिवभोजन चालकाला १०० मीटरच्या आत म्हणजेच शिवभोजन केंद्रावर उपस्थित राहूनच फोटो अपलोड करावा लागणार आहे.

            

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून,राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवभोजन  ही योजना २६ जानेवारी २०२० सुरु करण्यात आली.आतापर्यंत ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुमारे ८ कोटी ३४ लाख  ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.अल्पकालावधीत ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे.सध्या राज्यात १५२१ शिवभोजन केंद्र आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत अडीच कोटी  शिवभोजन थाळयांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे अशा सूचनाही छगन भुजबळ यांनी दिल्या.


Tags: chhagan bhujbalShiv bhojan Centreछगन भुजबळशिवभोजन थाळी
Previous Post

“पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखूया!”

Next Post

मुंबई संस्कृती आभासी संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन

Next Post
Mumbai Sanskriti Virtual Music Festival 2022

मुंबई संस्कृती आभासी संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!