मुक्तपीठ टीम
चंद्रवती वर्मा फिटनेस ट्रेनर आहेत. त्या त्यांच्या जबरदस्त फिटनेससाठीही ओळखल्या जातात. आता त्या समाजाला फिटनेस मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांना उत्तरप्रदेशातील हमीरपूर राठ या मतदारसंघातून समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली आहे. सायकलवर स्वारी करू लागलेल्या सपा उमेदवार चंद्रवती वर्मा यांचे व्हिडीओ आणि फोटो आता व्हायरल होत आहेत. फिटनेस ट्रेनर चंद्रवतीचा फिटनेस अप्रतिम आहे. डान्ससोबतच व्यायाम करतानाही चंद्रवती वर्माचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये ती एलपीजी सिलेंडर उचलून व्यायान करताना दिसत आहे. आताही राजकारणाच्या मैदानात आव्हान पेलत विजयी होण्याचा त्यांचा निर्धार आहे.
- चंद्रवती हैदराबादमध्ये जिम ट्रेनर आहेत.
- २ ऑक्टोबर १९९३ रोजी चंद्रवती वर्मांचा जन्म झाला.
- त्यांनी बी.पी.एड. केले आहे.
- त्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात.
- सध्या त्या स्वत:चा जिम चालवतात.
- गेल्या काही वर्षांपासून त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत.
- पूर्वी त्या हैदराबादमध्ये राहायच्या.
- गेल्या वर्षीच त्यांचे हेमेंद्र राजपूतसोबत लग्न झाले.
- लोधी समाजातील मतदारांची बहुसंख्या असलेल्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली आहे.
- चंद्रवती या अनुसूचित जातीतील असून त्यांचे पती राजपूत आहेत.
- चंद्रवती यांचे पती देखील फिटनेस ट्रेनर आहेत.
- दोघेही अनेक व्हिडिओंमध्ये एकत्र दिसत असतात.
- काही महिन्यांपूर्वी मतदारसंघातील एका लोधी तरुणीच्या आत्महत्येप्रकऱणी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला.
चंद्रवती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात
- चंद्रावती वर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे.
- सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या तरुणीवर विश्वास ठेवत तिला सपाची उमेदवारी दिली.
- एका जुन्या काँग्रेस नेत्याला सपाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती.
- मात्र, अखिलेश यादव यांनी सर्वांनाच धक्का दिला.
- प्रतिस्पर्धी पक्षांनाही त्यामुळे आश्चर्य वाटले.
- चंद्रावती मात्र निर्धार व्यक्त करतात, विश्वास सार्थ ठरवणार.
- समाजाचा फिटनेस राखण्यासाठी निवडणूक जिंकून विधानसभेत जाणार!