मुक्तपीठ टीम
येत्या सोमवारी १४ फेब्रु रोजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ह्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, उदय सामंत या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम ३/१/२०२२ ला सावित्रीबाईंच्या जयंतीला होणार होता. तथापि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वेळ न दिल्याने तो पुढे ढकलण्यात आला.
सदर पुतळा पुण्याचे शिल्पकार संजय परदेशी यांनी तयार केला आहे. पुतळा समितीतर्फे प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, प्रा. सोनावणे व प्रा हरी नरके यांनी या कामावर देखरेख केली.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन करण्यासाठी विद्यापीठाने राजेश पांडे, प्राचार्य संजय चाकणे व प्रा संजीव सोनावणे यांची समिती नियुक्त केली आहे.
कोरोनामुळे मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.(तो फक्त निमंत्रितांसाठीच खुला असेल.) : प्रा. हरी नरके