मध्य रेल्वे भर्ती मंडळाने अॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलपूरसह अन्य विभागांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत एकूण ३४५ पदे नेमली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
मध्य रेल्वे भरती मंडळाच्या अधिसूचनेनुसार, अॅप्रेंटीस पदावर अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावेत. या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार दहावीच्या गुणवत्तेच्या आधारे निवडले जातील. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांनी उच्च शिक्षण देखील घेतले असेल, तर केवळ दहावीच्या गुणांनाच प्राधान्य दिले जाईल. अधिक तपशील तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ दरम्यान असले पाहिजे. त्याबरोबरच आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल.
भरती पदे
सोलापूर –
कॅरेज आणि वॅगन डेपो येथे ५८ पद
कुर्डुवाडी कार्यशाळा येथे २१ पद
पुणे –
कॅरेज व वॅगन डेपो येथे ३१ पद
डिझेल लोको शेड येथे १२१ पद
नागपूर-
इलेक्ट्रिक लोको शेड येथे ४८ पद
अजनी कॅरेज व वॅगन डेपो येथे ६६ पद
अश्या एकूण ३४५ अप्रेंटीस पदांची भरती आहे.
अधिक माहितीसाठी, अर्ज करणारे उमेदवार https://www.rrccr.com/Home या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.