Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतरत्न लता मंगेशकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

February 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Lata MangeshKar

मुक्तपीठ टीम

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला शासकीय व लष्करी इतमामात, मंत्रोच्चारात अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन जवानांनी यावेळी मानवंदना दिली.

 

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,आमदार सुनील प्रभू,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मिलिंद नार्वेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह-चहल, तसेच लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर,भारतरत्न सचिन तेंडुलकर, लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान,अमीर खान, रणबीर कपूर,गायक शंकर महादेवन, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते, चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थितांनी आदरांजली वाहिली.

 

त्यांच्या राहत्या घरी प्रभुकुंज येथून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पर्यंत फुलांनी सजलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसोबत त्यांचे निकटवर्तीय होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते उपस्थित होते, यावेळी अनेकांना लतादीदींना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली . राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आपली श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वेळ कमी असतानाही शिवाजी पार्कात व्यवस्था

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्य सरकारची यंत्रणा आणि मुंबई मनपाला लता मंगेशकरांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी खास सोय करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसेनेचे माहिम मतदारसंघातील स्थानिक आमदार सदा सरवणकर हे शिवाजी पार्कमध्ये वेळेत सर्व उभारलं जावं यासाठी देखरेख करत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हेही तेथे बंदोबस्ताच्या व्यवस्थेवर खास लक्ष दिले. त्यामुळे वेळ कमी असूनही भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना योग्य प्रकारे अखेरचा निरोप देता आला.

पाहा व्हिडीओ:

 


Previous Post

“लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत! त्यांच्यासारखी गानकोकिळा पुन्हा होणे नाही!”

Next Post

“त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”

Next Post
Lata Mangeshkar

"त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!