मुक्तपीठ टीम
गाणकोकिळा, स्वरलता या आणि अशा अनेक उपाध्यांनी ज्यांचा जगभरात गौरव होत राहिला अशा लता मंगेशकरांचं जाणं संगीत रसिकांना हेलावून जाणारं ठरलं आहे. विशेष म्हणजे घरचंच कुणीतरी गेल्यासारखं शोकमग्न झालेल्यांमध्ये रस्त्यावरच्या सामान्य संगीत रसिकांपासून पंतप्रधानपदावरील नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मनातील भावना शब्दांमध्ये…
न भरून येणारी पोकळी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्या सोडून गेल्यानं एक पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतल्या एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लतादीदींच्या आवाजाचा परिसस्पर्श मनांमध्ये गुंजत राहिल…- शरद पवार
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भारतीय संगीताचा आत्मा हरपला… – देवेंद्र फडणवीस
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. #LataMangeshkar pic.twitter.com/D0sZI0x2RY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.
अजरामर गाण्यांमुळे लतादिदी सदैव आपल्यासोबत असतील – चंद्रकांत पाटील
भारताचा सुमधुर सूर हरपला !
लता दीदी आपल्याला सोडून गेल्या या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या हजारो गाण्यांचा सुरेल प्रवास आणि आवाज अजरामर राहणार आहे. संगीत क्षेत्रातील या प्रतिभासंपन्न महागायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली !🙏🏼 pic.twitter.com/RCdvohh3Wq— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 6, 2022
संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. तथापि, आपल्या अजरामर गाण्यांमुळे त्या सदैव आपल्यासोबत असतील, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, दैवी सुरांमुळे आणि अलौकिक गायनामुळे लता मंगेशकर यांना देशातील घराघरात आणि मनामनात स्थान मिळाले आहे. आयुष्यातील सुखदुःखाच्या अशा दोन्ही प्रसंगात लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी मनाला साद देतात. महान गायिका असण्यासोबतच त्या तितक्याच देशभक्त होत्या. त्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान होता. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.