Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाईन ही १००% दारूच; बिअरच्या दुपटीपेक्षा जास्त अल्कोहोल! वाचा कशात किती?

डॉ. कल्याण गंगवाल यांचे स्पष्टीकरण; सुपर मार्केट, किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी

February 4, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr Kalyan Gangwal

मुक्तपीठ टीम

वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मोठे असते. बिअरमध्ये ४ ते ८ टक्के अल्कोहोल असते तर वाईनमध्ये तेच अल्कोहोलचे प्रमाण हे १४ ते २४ टक्के असते. त्यामुळे. वाईन ही शंभर टक्के दारूच असून, आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला माता-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, साधुसंत, कीर्तनकार यांनी एकत्रित येऊन जनआंदोलन उभारण्याची गरज आहे, असे आवाहन शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.

अल्कोहोलचे प्रमाण

वोडका – ४०-९५%
रम – ३६-५०%
व्हिस्की – ३६-५०%
टेकीला  ५०-५१%
वाईन – १४-२४%
बियर – ४-८%
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निर्णयाचा निषेध केला व त्याविरोधात व्यापक चळवळ उभारण्याचे आवाहन केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “वाईन ही दारू नाही, हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे, हे एक डॉक्टर म्हणून नमूद करतो. सरकारमधील काही लोक निर्लज्जपणे वाईन दारू नसल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे व्यसनमुक्तीसाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घालणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांच्या निधनादिवशीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याच्या दिशेने केलेली वाटचाल आहे.”

सरकारकडून व्यसनाधीनतेला प्रोत्साहन

“समाजाचे आरोग्य चांगले, सदृढ, व्यसनमुक्त असावे, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असताना सरकारकडून दारूला प्रोत्साहन दिले जात आहे, हे अतिशय गंभीर आहे. सुशांतसिंह राजपूत आणि आर्यन शाहरुख खान प्रकरणातही राज्य सरकारने अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याना पाठीशी घालण्याचे चुकीचे काम केले आहे. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण भरपूर असते. हळूहळू वाईन, हार्ड ड्रिंक, दारू, अंमली पदार्थ असे त्याचे व्यसन लागू शकते. वाईन सहजपणे उपलब्ध व्हायला लागली, तर शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जातील. विक्रेत्यांकडून या किशोरवयीन मुलांना ग्राहक बनवण्याचा प्रकार वाढेल. हा प्रकार पाश्चिमात्य देशांत झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि भारताच्या दृष्टीने ही धोक्याची सूचना आहे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त 

मूठभर शेतकरी आणि सरकारमधील काही नेतेमंडळीच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “महाराष्ट्रात गुन्हेगारीचे मूळ दारू हे आहे. ग्रामीण भागात महिलांचे, मुलांचे जीवन पर्यायाने कुटुंबे दारूने उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली आहेत. समाजाची बिघडलेली ही घडी सुधारण्यासाठी गेली अनेक वर्षे माझ्यासह डॉ. अनिल अवचट, वसुधा सरदार, बंडातात्या कराडकर महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकांनी स्वतःला वाहून घेतले आहे. या नव्या निर्णयाने कामगार, कष्टकरी, तरुण वर्ग दारूच्या आहारी जाण्याची भीती आहे. सरकारने यावर त्वरित विचार करून हा निर्णय रद्द केला पाहिजे.”

व्यापक जनआंदोलन उभारणार

“वाईनचा प्रचार व प्रसार राज्य सरकारने करू नये आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी समाजाने एकत्रित येत व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. राज्यभरातील पालक, शिक्षक, माता-भगिनी, साधुसंत, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी या निर्णयाचा निषेध करावा. व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. येणाऱ्या पिढ्या बरबाद होण्यापासून वाचवायचे असेल, तर आज आपण याविरोधात आवाज उठवला पाहिजे. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे,” असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.

Previous Post

ऊसतोड कामगाराची लेक, कुस्तीत पटाईत नंबर १!

Next Post

गणपती बाप्पा मोरया…गणेश जयंतीचं धार्मिक महत्व काय?

Next Post
ganpati

गणपती बाप्पा मोरया...गणेश जयंतीचं धार्मिक महत्व काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!