Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगासस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा! : नाना पटोले

January 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nana patole critisize Modi Govt on Pegasus Case

मुक्तपीठ टीम

पेगासस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगासस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावेळी क्षेपणास्त्र प्रणालीबरोबरच पेगासस हे स्पायवेअरही खरेदी केले होते. हा करार २ अब्ज डॉलरचा होता. दोन्ही देशांची शस्त्रास्त्रे आणि इंटेलिजेंस गियर पॅकेज खरेदी करण्यावर सहमती झाली होती. यातच पेगासस आणि क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश होता. पेगाससप्रकरणी राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. संसदेत काँग्रेस व विरोधी पक्षांनीही या विषयावर सरकारला प्रश्न विचारले होते परंतु मोदी सरकारने याचा साफ इन्कार केला होता. पेगाससची खरेदी ही फक्त दोन देशातच केली जाते असे इस्त्राईलने स्पष्ट केले होते. त्यावरूनच हे हेरगिरी तंत्रज्ञान सरकारने किंवा सरकारच्यावतीने कोणी खरेदी केले का असा विरोधी पक्षांचा सरकारला थेट सवाल होता परंतु मोदी सरकारने संसद, सुप्रीम कोर्ट व भारतीय जनतेला खोटी माहिती दिली, त्यांची दिशाभूल केली हे आता स्पष्ट झाले आहे.

 

पेगाससच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुलजी गांधी, त्यांच्या कार्यालयातील ५ सहकारी, विरोधी पक्षांचे नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, न्यायाधीश, पत्रकार, संरक्षण दलातील अधिकारी, सरकारविरोधी भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरच मोदी सरकारमधील काही मंत्री व त्यांच्या स्टाफची हेरगिरी करण्यात आली होती. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य अशा पद्धतीने हेरगिरी करत धोक्यात आणून त्यांच्या खाजगी आयुष्यात घुसखोरी केली आहे. केंद्र सरकारने हेरगिरी केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते परंतु आता न्यूयॉर्क टाईम्सनेही मोदी सरकारचा खोटा बुरखा टराटरा फाडला आहे, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


Tags: Congress State President Nana PatoleNarendra modiPegasuspegasus spywareनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदीपेगाससपेगासस स्पायवेअर
Previous Post

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीच्या मुकाबल्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनं – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

महात्मा गांधीजींच्या हत्येसाठी झाले होते पाचवेळा अयशस्वी प्रयत्न…

Next Post
Mahatma Gandhi

महात्मा गांधीजींच्या हत्येसाठी झाले होते पाचवेळा अयशस्वी प्रयत्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!