Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न

January 29, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
govt effort to showcase the speeches, writings,And ideas of leaders

मुक्तपीठ टीम

महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार संकलित आणि संपादित, संशोधन करुन साहित्य प्रकाशित करुन जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी विविध चरित्र साधने समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            

सह्याद्री अतिथीगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती बैठक झाली.  

            

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक जडणघडणीत महान व्यक्ती व समाजसुधारकांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. या महापुरुषांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष त्यांनी समाजासाठी राष्ट्रासाठी केलेला त्याग त्यांच्या साहित्यातून डोळ्यासमोर उभा राहातो. यातून प्रेरणा घेऊन सध्याची पिढी राष्ट्राचा आणि राज्याचा विकास यात आपले योगदान देत असते. महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी चरित्र साधने समिती गठीत करण्यात आल्या आहेत. विविध चरित्र समित्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडे लेखी प्रस्ताव समितीकडून पाठवावा. या मागण्यासंदर्भात लवकरच एकत्रित बैठक घेवून सदस्य सचिवांचे मानधन, प्रवासभत्ता, राहण्याची व्यवस्था, यासाठी लागणारे मनुष्यबळ, कार्यालय व्यवस्था याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

            

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्तम दर्जाचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी सर्व मान्यवरांनी कालमर्यादेत संशोधनाला गती द्यावी, विविध मान्यवरांच्या गुणवत्तेचा आदर करुन समित्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

            

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रदिप आगलावे, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव प्रा.हरी नरके, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ. श्रद्धा कुंभोजकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सिद्धार्थ खरात, विविध समित्यांचे सदस्य आदी उपस्थित होते.


Tags: Dr. Nitin Rautuday samantउदय सांमत
Previous Post

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत ९ शैक्षणिक संस्थांचे सामंजस्य करार

Next Post

हुतात्मा दिनी दोन मिनिटे मौन पाळण्याचे निर्देश

Next Post
Instruction to Follow two minutes of silence on Hutatma Day

हुतात्मा दिनी दोन मिनिटे मौन पाळण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!