Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरमधील चिमुरड्याच्या बळीसाठी फक्त रुग्णवाहिका चालक दोषी कसे? आरोग्याच्या १७ हजार कोटीपैकी फक्त ८ हजार कोटींचा वापर!!

राज्याच्या अर्थसंकल्पातील ५ लाख ६१ हजार १५३ कोटींपैकी फक्त ३९% टक्के खर्च! मंत्रालय ते आरोग्य केंद्र झाडाझडतीची गरज!

September 6, 2026
in आरोग्य, सरळस्पष्ट
0
plaghar kid death 25-1-22

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

पालघर जिल्ह्यातील अजय युवराज पारधी या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वरात्री झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर सरकारी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकांनी पैसे नसतील तर पायी जाण्यास सुनावले. त्यामुळे पालकांना मोटरसायकलवरून मृतदेह न्यावा लागला. दक्ष नागरिकांमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर मांडले गेले. त्यानंतर वाढता संताप पाहून राज्य सरकारने घाईघाईत दोन रुग्णवाहिका चालकांना निलंबित करून कारवाईचे नाटक केले. पण त्यासाठी मंत्रालयापासून आरोग्य केंद्रांपर्यंतचे सर्वच दोषी असल्याचा आरोप होत असून आरोग्यासाठीच्या तरतुदीतील निम्म्यापेक्षाही जास्त रक्कम यावर्षी खर्चच झालेली नसल्याचा दावा आरोग्य कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

पाहा सरळस्पष्ट चर्चेचा व्हिडीओ:

 

चिमुरड्याच्या मृत्यूसाठी दोन रुग्णवाहिका चालकांना निलंबित करणे योग्यच, पण तेवढ्यावरच कारवाई थांबवणे योग्य नाही. कारण मुळात रुग्णवाहिकांचा मुद्दा हा अजयच्या मृत्यूनंतर आला. त्याआधी दोन दिवस त्या चिमुरड्याच्या उपचारात झालेल्या अक्षम्य दिरंगाईसाठी आरोग्य खात्याची अनावस्थाच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाई करायचीच तर फक्त कनिष्ठ तळातील कर्मचाऱ्यांवर न करता मंत्रालय ते आरोग्य केंद्रापर्यंत प्रत्येक स्तरात करण्याची मागणी मुक्तपीठच्या सरळस्पष्ट चर्चेत सहभागी समाजसेवक निलेश सांबरे, डॉ. विजय कदम आणि मानवाधिकार कार्यकर्ते जयेश मिराणी यांनीही केली. मिराणी हे या मुलाचा मृत्यू गुन्हेगारी स्वरुपाच्या दुर्लक्षातून झाला असल्याचा आरोप करत न्यायालयात दाद मागणार आहेत.

आरोग्य कार्यकर्ते विनोद शेंडे यांनी तर राज्य सरकारची आरोग्य सेवेविषयक अनास्था आकडेवारीतून उघड केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील ५ लाख ६१ हजार १५३ कोटींपैकी २७ जानेवारीपर्यंत फक्त ३८.९१५ टक्के खर्च झाले आहेत. आरोग्यासाठी फक्त १७ हजार १८३ कोटींची तरतुद आहे, त्यापैकीही फक्त ७ हजार ८५६ कोटी म्हणजे ४५.७२ टक्के खर्च झाले आहेत. यामुळे आरोग्य सेवेकडेच दुर्लक्ष होत असल्याने पालघरसारख्या जिल्ह्यांमधील मुळातच नसलेली आरोग्य व्यवस्था अधिकच कोलमडते आहे.

आरोग्य खात्याची कामगिरी बरी म्हणावी अशी परिस्थिती एकंदर एकूण सरकारी कारभाराची आहे.
महाराष्ट्राचे सन २०२१-२२ चे एकूण बजेट 5,61,153.402 कोटी रुपये आहे. दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी यातील केवळ 38.915 टक्के म्हणजे 2,18,376.25 कोटी इतका खर्च झाला आहे.
याच बजेटमध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी 17,183.109 कोटींची तरतूद केली आहे. यातील केवळ 7,856.469 कोटी म्हणजे 45.72 टक्के निधी खर्च झाला आहे. ही गंभीर बाब आहे.

कोरोनोच्या काळात सर्व आरोग्यव्यवस्था कोरोनो फोकस झाली होती. मात्र इतर आजारांकडे या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे, असेही विनोद शेंडे म्हणाले.

 

 


Tags: kid deathPalgharstate budgetचिमुरड्याचा मृत्यूपालघरराज्य अर्थसंकल्प
Previous Post

विविध आंबेडकरी संघटनांचा ३८ हून अधिक मागण्यांसाठी आझाद मैदानात एल्गार!

Next Post

राज्यात २५ हजार ४२५ नवे रुग्ण, ३६ हजार ७०८ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post
maharashtra corona report

राज्यात २५ हजार ४२५ नवे रुग्ण, ३६ हजार ७०८ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!