Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य

महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

January 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Yashomati Thakur

मुक्तपीठ टीम

महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे,असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.

 

ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महिलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली. महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कोव्हीड काळात महिला व बालविकास विभागाने अनाथ बालके,विधवा महिला यांच्यासाठी  विविध उपक्रम राबविले. कोव्हीड काळात अंगणवाडी ताईंनी केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल ही माहिती त्यांनी दिली.

 

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 3 टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागासाठी  उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे तसेच त्यांना ई-बिजनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, असेही मंत्री ॲड.  ठाकूर यांनी सांगितले.

 

कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येईल. महिला सबलीकरण तसेच महिलांचे विविध प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी ऑस्ट्रेलिया वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल, असेही श्री. ब्राऊन यांनी सांगितले.


Tags: Australian ConsulateConsulate General Michael BrownEconomic and social empowerment of womengood newsmuktpeethWomen and Child Development Minister Yashomati ThakurWomen Empowerment Schemeऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासकॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊनमहिला आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणमहिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूरमहिला सक्षमीकरण योजना
Previous Post

संविधान वाचनाने प्रजासत्ताक दिन शाळेत उत्साहाने साजरा !

Next Post

आपलं संविधान! मूळ प्रत कशी राखली जाते सुरक्षित? जाणून घ्या महत्वाची माहिती…

Next Post
indian Constitution

आपलं संविधान! मूळ प्रत कशी राखली जाते सुरक्षित? जाणून घ्या महत्वाची माहिती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!