मुक्तपीठ टीम
देशात कोरोनामुळे सावट असले तरी कोरोना आरोग्य विषयक सुचनांचे व नियमांचे पालन करून राज्यातील शाळांमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज अंधेरी येथील निवासी शाळेत संविधानाचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी व जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, तसेच लसीकरणसाठी पालकांना व विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही “फ्रन्ट लाईन वर्करची”आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री धर्मेंद्र द्विवेदी सरांनी केले.