मुक्तपीठ टीम
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनपासून ८ – ९ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक आगळा – वेगळा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आहे ओम स्वामी समर्थ साधना केंद्राचा. फक्त चांगली जमीन असून उपयोग नाही तर बीजही चांगलं असावं, या संकल्पनेवर ही संस्था काम करत आहे. खरंतर चांगल्या बीजांचा संबंध खडकाळ जमिनीशी आला तरी त्याचा उपयोग नाही, असं मानलं जातं. परंतु ओम स्वामी समर्थ साधना केंद्राने एका खडकाळ जागेत नंदनवन उभारलंय.
तेथे वैश्विक ऊर्जा उपचार पद्धती, प्राचीन मंत्रशास्त्र, आयुर्वेद व वनस्पतीशास्त्र यांचा उपयोग केला जातो. केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट वृक्षवनस्पतींवर नैसर्गिक व आध्यत्मिक उपचार पद्धतींचा अवलंब करणे हा आहे. त्यामुळे संस्थेची भूमिका व सर्व कार्य ज्ञान व विज्ञान यावरच आधारित आहेत. यासाठी ऑरा टेक्नॉलॉजी व इतर विज्ञानमान्य तंत्रांचा वापर केला जातो. केंद्राला अनेक माननीय वैज्ञानिक याविषयी सखोल संशोधन करण्यासाठी भेट देतात. केवळ भारतीयच नव्हे तर अनेक विदेशी पर्यटक व विध्यार्थी येथे काही काळ राहून संस्थेचे संस्थापक परम पूज्य श्री दीपक जोशी यांच्याकडून आयुर्वेद आणि वनस्पतीशास्त्र या विषयाबाबत मार्गदर्शन घेतात.
ओम स्वामी समर्थ साधना केंद्राचे संस्थापक आहेत श्री दीपक जोशी उर्फ जोशी काका. जोशी काकांनी त्यांच्या नाथपंथीय श्रीगुरुंकडून आणि अनेक श्रेष्ठ वैद्य यांच्याकडून आयुर्वेद वनस्पतीशास्त्र व प्राचीन विद्यांचे सखोल ज्ञान पूर्णपणे आत्मसात केले. त्यांना ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र यांतील ज्ञानाबरोबरच मर्मचिकीत्सा आणि मसाज यांतही त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त केले आहे. अनेक श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी मंत्रशास्त्रांचे ज्ञान संपादन केले आहे.आधुनिक विज्ञान व प्राचीन ग्रंथातील ज्ञान यांची सांगड घालून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जोशी काकांनी केंद्राची निर्मिती केली आहे. ओम स्वामी समर्थ साधन केंद्रातील त्यांच्या वनसंवर्धनातील अथक, महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ” वनश्री ” ने जोशी काकांना २००८ साली राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ” वृक्षमित्र पुरस्कार ” प्रदान केला. तसेच ” संजीवन गुरुकुल ” ( २०११ ), ” निसर्ग मित्र ” ( २०१३ ), ” नक्षत्र भास्कर ” ( २०१५ ),” रायगड भूषण ” ( २०१८ ), ह्या पुरस्कारांनी काकांना सन्मानित करण्यात आले आहे.
ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे देशातील एकमेव स्थान आहे जेथे आयुर्वेदातील अत्यंत महत्वाच्या अश्या वृक्षवनस्पतींच्या शेकडो जाती एकत्र आढळतील. यातील बरेच वृक्ष तर अत्यंत दुर्मिळ आहेत. तसेच या प्रकल्पामध्ये भारतातील पहिले राशी नक्षत्रवन अर्थातच प्राचीन ग्रंथाप्रमाणे २७ नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नक्षत्र वृक्षांच्या सानिध्यांचे सकारात्मक परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतात याचा अनुभव घेण्यासाठी अनेक साधक नियमितपणे नक्षत्र वनात साधनेसाठी येतात. तसेच केंद्रामध्ये बौद्ध दर्शनावर रचित अनेक ग्रंथामध्ये गौतम बुद्धांच्या व्यतिरिक्त हि अनेक निर्वाण प्राप्त बुद्धांचे उल्लेख आढळतात. यातील काही बुद्धांनी तपचर्येसाठी निवडलेल्या वृक्षांचे बोधी वन सुद्धा पहायला मिळते. श्री कृष्णाने सांदीपनीऋषींच्या आश्रमात ६४ झाडांखाली बसून ६४ कला संपादन केल्या. या ६४ वृक्षांवर संस्कार करून जोशी काकांनी शांती वन निर्माण केले. जैन धर्मातील तीर्थंकरांनी निर्वाणपद प्राप्त कारण्याहेतू तपचर्येसाठी निवडलेल्या वृक्षांचे अभिमंत्रित चैत्य वन केंद्रात उभे आहे. संस्थेत संस्कारित २१ वृक्ष वनस्पतिंची लागवड करून श्री गणेशपत्री वन उभे केले आहे तसेच लुप्त होणारी देवराई ह्या संकल्पनेचे संगोपन हि संस्था करत आहे.
शेकडो आयुर्वेदिक वृक्ष जसे दशमुळारिष्ठ,पीसा, लोध्र, पुत्रंजिवा, वावडिंग, अर्जुनसाल, राळ, कृष्णांगरु, रागतरोहिडा, शेंद्री,रुद्राक्ष,भद्राक्ष, कृष्णवड,आदी औषधीय वृक्ष एकाच ठिकाणी पहायला मिळतात. येथे फळ झाडे व विविध फुलांचे झाडे बघायला मिळतात. केंद्रातील प्रत्येक वृक्षांवर जोशी काकांनी मंत्रशास्त्राच्या पद्धतीने २१ दिवसांची वृक्षांची शाळा आणि वैश्वीक ऊर्जाची सांगड घालून वृक्षांची लागवड येथे केली आहे.
केंद्रातील सर्व वृक्ष एज्युकेटेड आहेत असे जोशी काका नेहमीच अभिमानाने संगतात. वृक्षवनस्पतिंना हि भावना असतात आणि वृक्ष हि आपल्याशी संवाद साधतात हा अनुभव तुम्ही स्वतः या संस्थेला भेट देऊन घेऊ शकता.
वृक्ष वनस्पतींकडे बघायचा आपला दृष्टीकोन हा जोशी काकांना भेटल्यावर नक्कीच बदलतो!
निसर्गाचे संवर्धन आणि स्वतःच्या आंतरिक चैत्यन्याचे संवर्धन यांचा जवळचा संबंध आहे. निसर्गासाठी वननिर्माणचे कार्य करतानाच, केंद्र सर्वांनाच आंतरिक विकास आणि शांतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहे. जोशी काका सर्वांना मनःशांती मिळावी म्हणून तसेच सकारात्मकता वाढवण्यासाठी विविध अध्यात्मिक साधना वर्ग घेतात.
- कॉस्मिक हीलिंग
- ओंकार साधना
- त्राटक साधना
- षटचक्रदर्शन ध्यान
- सोहम साधना
आपल्या निसर्गासाठी आपलेच योगदान !!!
ओम स्वामी समर्थ साधना केंद्र वनसंगोपन. वननिर्माण आणि औषधी वनस्पती संगोपन या क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे तुम्ही संस्थेला दिलेले योगदान हे सृष्टीच्या हिरव्यागार लेकरांना दिलेला प्रेमाचा खाऊच ! ” ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या ” माध्यमातून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी तुम्हीही उभे रहा !!!
पत्ता:
ओम स्वामी समर्थ साधना केंद्र ,
मु. पो. वडघर – पांगळोली, ता : श्रीवर्धन, जिल्हा : रायगड,
संकेतस्थळ : www.o3sk.com
फोन नंबर : ७७४४८१३२२६, ७७४५०२६०१४,
youtube channel : om swami samarth sadhana kendra,
swami sampada ( hindi channel ).
पाहा व्हिडीओ: