Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित राहणार!

January 25, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray neck surgery successful

मुक्तपीठ टीम

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाला शिवाजी पार्क मैदानावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होईल.

 

अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार

  • जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
  • १२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते.
  • या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते.
  • आता प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क इथं होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

मुंबई मनपाकडून जोरदार तयारी

  • दोनच दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधले. दरम्यान, मुंबई मनपा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सतर्क झाली आहे.
  • त्या दृष्टीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई मनपाकडून तयारी करण्यात येत आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता मनपाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत या निर्णयाचं भाजपच्यावतीनं स्वागत करण्यात आलं आहे.

Tags: BMCcm uddhav thackerayrepublic dayshivaji parkप्रजासत्ताक दिनमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई मनपाशिवाजी पार्कस्पाईन शस्त्रक्रिया
Previous Post

काँग्रेस नेते शशी थरुरांचा भाजपाला टोला, २०१४च्याआधीच देशात नेताजींच्या नावाने १६४ संस्था!

Next Post

“निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट!” – चंद्रकांत पाटील

Next Post
Chandrakant patil criticize Cm Uddhav Thackeray on nagarpanchayat election

"निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट!" - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!