मुक्तपीठ टीम
मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये जाणवत असलेले धुरकट वातावरण हे पाकिस्तानातील बलुचीस्तानात उसळलेल्या धुळीच्या वादळामुळे आहे. गुजरात आणि उत्तर भारतात नेहमी फटका देणारे हे धुळीचे वादळ आता मुंबईतील हवामानावरही परिणाम घडवत आहे. महामुंबई परिसरातील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. त्याचे कारण तेथे उसळलेल्या धुळीच्या वादळामुळे आपल्या भागात धुळीचे वारे सुटले आहेत.
हवा गुणवत्ता खालावली
- मुंबई, कोकण पट्ट्यात गेले काही दिवस सकाळपासूनच ढगाळ वातावरण असते.
- आता पुण्यातही तसे वातावरण असल्याचे कळते.
- अनेक ठिकाणी धुरकट वातावरण आहे.
- मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावत आहे.
- मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० वर आहे.
- मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार झाला आहे.
- दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत पोहचली आहे.
धुळीचे वादळ म्हणजे नेमकं काय?
- मोठ्या प्रमाणात धूलिकण किंवा वालुकाकण भूपृष्ठावरून हवेत बऱ्याच उंचीपर्यंत फेकले जातात, तेव्हा धुळीचे वादळ तयार होते.
- धुळीच्या वादळांमध्ये वाऱ्यांबरोबर मुख्यतः वेगाने वाहत जाणारी धूळ काही वेळा वाळू यांचा समावेश असतो.
वाळवंटे किंवा अन्य ओसाड अर्धशुष्क प्रदेशांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर अशी वादळं नेहमीच तयार होतात. - तेथून ती सभोतालच्या प्रदेशांमध्येही जात असतात.
- आता मुंबई, कोकणपट्टीवर आलेले धुळीचे वादळ हे पाकिस्तानातील बलुचीस्तान या शुष्क प्रदेशात तयार झालेले आहे.
- जगभरात उ. अमेरिका, सहारा, ईजिप्त, अरेबिया, इराक, इराण, पाकिस्तान, थरचे वाळवंट, उत्तर भारत, चीन, गोबीचे वाळवंट, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांवर ही वादळे निर्माण होतात.
धुळीच्या वादळाचे दुष्पपरिणाम काय?
- धुळीच्या वादळांचा फार मोठ्या क्षेत्रावर प्रभाव पडतो.
- धुळी वादळांमुळे भुसभुशीत जमिनीची फार मोठ्या प्रमाणावर धूप होते व नको त्या ठिकाणी धुळीचे थर जमा होतात.
- अनेकदा धुळीच्या वादळांमुळे काही विशिष्ट भूप्रदेशांवर कित्येक टन धुळही जावून पडते. तसे अमेरिका, युरोपात झाले होते.
- दाट धुळीच्या वादळात दृश्यमानता इतकी कमी होते की, ५ मीटरपेक्षा दूर अंतरावरच्या वस्तूसुद्धा स्पष्ट दिसत नाहीत.
- या वादळामुळे अस्वस्थता येते, वातवरणीय दृश्यमानता मंदावते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात.
- विमान वाहतुकीला तर धुळीची वादळे अत्यंत धोक्याची असतात.
धुळीच्या वादळाचे आरोग्यावरही दुष्परिणाम
- ही धुळीची वादळे आरोग्याच्या दृष्टीनेही अपायकारक असतात.
- धुळीचे दाट झोत हवेत फेकले गेल्यामुळे व वातावरणात धूलिकण दीर्घकालापर्यंत राहिल्यामुळे विस्तीर्ण भूपृष्ठावर येणाऱ्या सौर प्रारणात (तरंगरूपी ऊर्जेत) घट होते.
- हजारो चौ.किमी. क्षेत्रातील हवामानावर त्यामुळे परिणाम होऊ शकतो.