मुक्तपीठ टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोंदीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक होऊन राज्यभर पटोलेंच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोल करत आहेत.दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झाकीर अहमद यांनी भाजपावर पलटवार केला असून, नाना पटोले यांना अटक करण्याऐवजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनाम्यासाठी निषेध केला पाहिजे. कारण, अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा देशातील अन्नदाता शेतकऱ्यांचा मारेकरी आहे, त्याने लखीमपूर खेरी येथे आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांची चिरडून हत्या केली होती. अशा खुनी मुलाचा बचाव करणाऱ्या अजय मिश्राला नरेंद्र मोदींनी अजून हटवलेले नाही.
ते पुढे म्हणाले की, नाना पटोले पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह काहीही बोलले नाही. पटोले यांची भावना आरशाप्रमाणे स्पष्ट दिसत होती. राजकीय-सामाजिक जीवनात कोणत्याही चुकीच्या गोष्टी विरोधात खंबीरपणे उभे राहावे, अशी त्यांची भावना होती. मग तो समोरचा रस्त्यावरचा गुंड असो किंवा माणूस कितीही मोठा असो. अशा स्थितीत या प्रकरणी पटोले यांना अटक करण्याची मागणी पूर्णपणे चुकीची आहे.
पटोले यांच्या शब्दांवर कायदेशीररीत्या एफआयआर होत नाही. भाजपाच्या सदस्यांना उपोषण करायचेच असेल, तर त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनाम्यासाठी आणि त्यांना अटकेसाठी करावे, ज्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आणि ज्यांच्या मुलाने आपल्या साथीदारांसह शेतकऱ्यांची हत्या केली. झाकीर अहमद म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूने भाजपाचे हृदय तुटलेले नाही आणि आता मोदींच्या नावाने खोटी पडताळणी करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.